आता केतकी चितळेविरोधात देहू संस्थान आक्रमक ; देहूरोड पोलिसांत निवेदन | पुढारी

आता केतकी चितळेविरोधात देहू संस्थान आक्रमक ; देहूरोड पोलिसांत निवेदन

देहूरोड ; पुढारी वृत्तसेवा : अभिनेत्री केतकी चितळे हिने ‘तुका म्हणे’ असे शब्द वापरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवारांची खिल्ली उडवली. यावर संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थानने तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी केतकीवर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन संस्थानच्या वतीने देहूरोड पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

संत वाड्मयात ‘तुका म्हणे’ या शब्दाचा अर्थ तुकाराम महाराजांनी म्हटलेले अभंग असा होतो. ही एक प्रकारे स्वाक्षरी आहे. केतकी चितळे हिने संत तुकाराम महाराजांचे ‘तुका म्हणे’ वापरून शरद पवारांवर टीका केली आहे. त्यामुळे संताबद्दल अपशब्द वापरल्याचे  प्रत्यक्षदर्शीनी दिसत आहे. यावर संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी हरकत घेतली आहे. देहूतील कुठल्याही संतांचे अशाप्रकारे नाव घेऊन यापुढे टीका केल्यास संस्थान विरोध करेल. केतकीवर कारवाई करण्यात येऊन तिने तुकाराम महाराज यांची त्वरित माफी मागावी, अशी मागणी या निवेदनातून करण्‍यात आली आहे.

ही वाचलंत का ? 

Back to top button