भंडारा: ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा मृत्यू | पुढारी

भंडारा: ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा मृत्यू

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : ट्रॅक्टर पलटून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१४) रात्री ८ वाजताच्या दरम्यान लाखांदूर तालुक्यातील आथली येथे घडली.  देवेंद्र आळे (वय ४०, रा. पिंपळगाव, जि. भंडारा) असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

कुरुंदवाड : पंचगंगेच्‍या काठी माशांचा खच; मासे नेण्यासाठी नागरिकांची गर्दी

पिंपळगाव कोहळी येथील योगेश लांजेवार यांचा ट्रॅक्टर क्रमांक एम. एच.  ३६ डी. ९४८६ हा विटाभट्टीसाठी लागणारे लाकडे आणण्याकरिता लाखांदूर आथली या पणंद रस्त्याने वेगाने जात असताना ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पलटला. यात चालक देवेंद्र आळे इंजिनमध्ये दबून गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती विटाभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना कळताच त्यांनी ट्रॅक्टर चालक देवेंद्र आळे यांना बाहेर काढून तात्काळ ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे दाखल केले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

लातूर : व्यायाम करताना भरधाव कारची धडक ; तरुण ठार, एक जखमी

 

Back to top button