Shopian Encounter: जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये 'सीआरपीएफ'च्‍या पथकावर दहशतवादी हल्‍ला, नागरिकाचा मृत्‍यू | पुढारी

Shopian Encounter: जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये 'सीआरपीएफ'च्‍या पथकावर दहशतवादी हल्‍ला, नागरिकाचा मृत्‍यू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

जम्‍मू-काश्‍मीरमधील शोपियान येथे आज दुपारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या ( सीआरपीएफ ) पथकावर दहशतवाद्‍यांनी हल्‍ला केला. यावेळी जवानांनी  त्‍यांना चोख प्रत्‍युतर दिले. या दहशवतादी हल्‍ल्‍यात एका नागरिकाचा मृत्‍यू झाला. दरम्‍यान, या घटनेनंतर सुरक्षा दलांनी शोध मोहित तीव्र केली आहे. ( Shopian Encounter )

शोपियान जिल्‍ह्यातील तुर्कवागाम परिसरात सीआरपीएफचे पथक जात होते. यावेळी तुर्कवागामला पुलवामाशी जोडणार्‍या पुलावर दहशतवाद्‍यांनी सीआरपीएफच्‍या गस्‍ती पथकावर हल्‍ला केला. हल्‍ला केला. यामध्‍ये एक नागरिक जमखी झाला. त्‍याला तत्‍काळ स्‍थानिक रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. उपचार सुरु असताना त्‍याचा मृत्‍यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Shopian Encounter: स्‍थानिक नागरिकांची निदर्शने

दहशतवादी हल्‍ल्‍यात नागरिकांचा मृत्‍यू झाल्‍याने स्‍थानिक नागरिक संतप्‍त झाले. रस्‍त्‍यवर उतरत त्‍यांनी निदर्शने केली. यावेळी सुरक्षा दलासह स्‍थानिक पोलीस नागरिकांना समजविण्‍याचा प्रयत्‍न केले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button