दहावी आणि बारावीचा निकाल जूनमध्येच मात्र अधिकृत घोषणा अद्याप नाही | पुढारी

दहावी आणि बारावीचा निकाल जूनमध्येच मात्र अधिकृत घोषणा अद्याप नाही

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बारावीचा निकाल जूनच्या दुसर्‍या आठवड्यात म्हणजेच 10 जूनपर्यंत, तर दहावीचा निकाल जूनच्या तिसर्‍या आठवड्यात म्हणजेच 20 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. मात्र यासंदर्भातील अधिकृत घोषणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप केलेली नाही.

राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी याचिका दाखल

जून मध्ये निकाल ही बातमी सर्वप्रथम ‘पुढारी’ने ६ मे रोजी ब्रेक केली. आज शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी त्यास पुन्हा दुजोरा दिला; मात्र तारखांची अद्याप घोषणा करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Russia Ukraine War Updates : युक्रेनवर हल्‍ला का केला? रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतीन यांनी सांगितले कारण

राज्य मंडळाने यंदा परीक्षा घेण्यावर ठाम राहत दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या. काही तांत्रिक कारणांमुळे परीक्षांच्या वेळापत्रकात बदलदेखील करावे लागले. त्यामुळे दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान पार पडली. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रियाही सुरू झाली असून, काही विषयांची उत्तरपत्रिका तपासणी अंतिम टप्प्यात आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा

priyanka chopra : प्रियांकाच्या लेकीचा पहिला फोटो आला समोर

Sri Lanka crisis : श्रीलंकेत अराजकता! संपूर्ण देशात कर्फ्यू लागू, सरकार समर्थक-आंदोलकांत जोरदार धुमश्चक्री

Accident : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टॅंकर पलटी; ३ जणांचा मृत्यू

Back to top button