वाकड : वाढत्या उन्हामुळे फुलांच्या किमतीत वाढ | पुढारी

वाकड : वाढत्या उन्हामुळे फुलांच्या किमतीत वाढ

वाकड : पुढारी वृत्तसेवा : वाढत्या तापमानामुळे फुले खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे. दहा रुपयांना मिळणारा हार आता 20 रुपयांना मिळू लागला आहे.

सांगली : महाविकास आघाडी हे बहुजनांचे सरकार हा फसवा दावा; गोपीचंद पडळकर

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक महागली असून त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. ग्रामीण भागातून फुले पिंपरी चिंचवड शहरात येण्यासाठी जास्त खर्च होत आहे. त्यामुळे फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे.

अमरावती : शेतीच्या वाटणीवरून डोक्यात दगड घालून सावत्र आईचा खून

वाढत्या उन्हामुळे सकाळी बनवलेला हार दुपारपर्यंत कोमेजून जात आहे. यामुळे हारांच्या किमती वाढले असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

‘ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका नकोत’

दुकानदारांना हार बनवण्यापेक्षा लग्नसराईच्या ऑर्डरमध्ये दोन पैसे अधिक मिळतात. त्यामुळे हार विकण्यापेक्षा लग्नाच्या ऑर्डर्स, फुलांचे बुके बनवण्यात जास्त रस असल्याचे दिसून येत आहे.

Cannes : कान्समध्ये ‘हे’ तीन मराठी चित्रपट सहभागी होणार

लग्नसराई आणि विविध सणांमुळे फुलांना जास्त मागणी आहे. परंतु, फुले महाग असल्यामुळे ग्राहक हार खरेदी करताना हात आखडता
घेत आहेत.

Back to top button