पुण्यात अर्बन स्ट्रीट प्रोग्रामचे वाजले तीन तेरा | पुढारी

पुण्यात अर्बन स्ट्रीट प्रोग्रामचे वाजले तीन तेरा

हिरा सरवदे

पुणे : अर्बन स्ट्रीट प्रोग्रामअंतर्गत महापालिकेने केलेल्या स्वारगेट ते कात्रज या सातारा रस्त्यावरील पदपथाच्या सुशोभीकरणाची पुरती वाट लागली आहे. पदपथांचे सुशोभीकरण अनेक ठिकाणी तुटले असून हिरवळही नाहीशी झाली आहे. अनेक ठिकाणी पदपथ आणि सायकल ट्रॅकवर व्यावसायिक अतिक्रमण झाल्याने ’वाहतूक सुरक्षितता आणि पादचारीपूरक रस्ता’ या संकल्पनेचे तीन तेरा वाजले आहेत.

Share Market Crash : सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना ५ लाख कोटींचा फटका!

अर्बन स्ट्रीट डिझाईन गाइड लाइनला मान्यता मिळाल्यानंतर 2016 मध्ये महापालिकेने पुणे स्ट्रीट प्रोग्रामचे नियोजन करून शहरातील रस्ते ’वाहतूक सुरक्षितता आणि पादचारीपूरक रस्ता’ या संकल्पनेवर सुशोभित करण्याचे नियोजन केले. या संकल्पनेवर आधारित महापालिकेने सर्वप्रथम जंगली महाराज रस्त्याचे सुशोभीकरण केले. यामध्ये पादचार्‍यांसाठी पुरेसा पदपथ, सायकल ट्रॅक, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, हिरवळ आणि विविध झाडे, नागरिकांना बसण्यासाठी सुशोभित बाकडी, फरशी टेबल, सायकल स्टँड आदींचा समावेश आहे.

मशिदींवर अजानसाठी भोंगे वापरणे हा मूलभूत अधिकार नाही : अलाहाबाद उच्च न्यायालय

रस्त्याच्या कडेला असे कचर्‍याचे साम्राज्य आहे.

भाजप नेते बग्गा यांच्या अटकेवरून प्रचंड राडेबाजी; पंजाब पोलिसांवर दिल्लीत गुन्हा दाखल

पुरस्कार मिळालेल्या रस्त्यांवर अतिक्रमणे

जंगली महाराज रस्त्याला स्मार्ट सिटीसह इतर पुरस्कार मिळाल्यानंतर महापालिकेने गोखले रस्ता (फर्ग्युसन), बिबवेवाडी रस्ता, सातारा रस्ता, राजभवन रस्ता, जुना मुंबई-पुणे रस्ता, औंध डीपी रस्ता, पाषाण-सूस रस्ता, कर्वे रस्त्याचा काही भाग असे एकूण 35 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सुशोभीकरण केले. मात्र, सातारा आणि कर्वे रस्त्यावरील सुशोभित पदपथांची पुरती वाट लावली आहे. पदपथ आणि सायकल ट्रॅकवर दुचाकी वाहने येऊ नयेत म्हणून उभे केलेले सिमेंटचे बहुतांश खांब खराब झाले आहेत, तर काही तुटून पडले आहेत. नागरिकांसाठी मोठे आणि सुशोभित केलेल्या पदपथांवर अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत.

COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम, २४ तासांत ३,५४५ नवे रुग्ण, २७ मृत्यू

याशिवाय सुशोभीकरणांतर्गत करण्यात आलेली हिरवळ नाहीशी होऊन त्या ठिकाणी राडारोडा आणि कचर्‍याचे साम्राज्य आहे.
अनेक ठिकाणी हिरवळीच्या भागातच दुचाकी पार्क केल्या जातात. अनेक ठिकाणी सुशोभीकरणाचे अस्तित्वच दिसत नाही. कामाचा दर्जा निकृष्ट आहे. त्यामुळे ’वाहतूक सुरक्षितता आणि पादचारीपूरक रस्ता’ संकल्पनेच्या नावाखाली सुशोभीकरणासाठी केलेला कोट्यवधींचा खर्च ठेकेदारांना पोसण्यासाठीच करण्यात आला की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

Citizenship Amendment Act : गृहमंत्री अमित शहा म्हणाले, ‘कोरोना संपताच CAA कायदा लागू करणार’

पदपथांची अशी अवस्था आहे.

जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

कोट्यवधी पाण्यात

स्वारगेट ते कात्रज यादरम्यान बीआरटी 5.4 किमी मार्गाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेने जवळपास 103 कोटींपेक्षा अधिक निधी खर्च केला. मात्र, एवढे करूनही पदपथ व रस्त्याचे सुशोभीकरण तुकड्यातुकड्याच्या स्वरूपात करण्यात आले आहे. कोेठे पदपथ आहे, कोठे पदपथ आणि सायकल ट्रॅक, पदपथ आहे, तर कोठे काहीच नाही. अनेक ठिकाणी सुशोभीकरण तुटलेले आहे. भंगार व्यावसायिक, फळ व्यावसायिक, वाहनचालक आदींनी अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे.

Back to top button