COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम, २४ तासांत ३,५४५ नवे रुग्ण, २७ मृत्यू | पुढारी

COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम, २४ तासांत ३,५४५ नवे रुग्ण, २७ मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशात गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (COVID19) संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३,५४५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या १९,६८८ वर पोहोचली आहे. दिवसभरात ३,५४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

याआधी बुधवारी दिवसभरात ३ हजार २७५ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ५५ कोरोनाबाधितांची मृत्यू झाला होता. दरम्यान, ३ हजार १० रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७४ टक्के आणि दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.७७ टक्के नोंदवण्यात आला होता.

राजधानी दिल्लीत कोरोना संसर्ग (COVID19) वेगाने फैलावत आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात १ हजार ३५४ कोरोनाबाधितांची भर पडली होती. दिल्लीचा कोरोनासंसर्गदर ७.६४ टक्के नोंदवण्यात आला. राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ५ हजार ८५३ पर्यंत पोहचली आहे. तर, नियंत्रण क्षेत्रांची संख्या १ हजार ३४३ पर्यंत पोहचली आहे.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८९ कोटी ८१ लाख ५२ हजार ६९५ डोस देण्यात आले आहेत. यातील २.९७ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून आतापर्यंत २ कोटी ८८ लाख ८० हजार ५६० बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १८ कोटी ८२ लाख २४ हजार ६८० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८३.९३ कोटी कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ६५ हजार ९१८ कोरोना तपासण्या गुरुवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

Back to top button