पुणे : इराणी टोळीतील दोघांना गुन्ह्यात सहा वर्षे सक्तमजुरी | पुढारी

पुणे : इराणी टोळीतील दोघांना गुन्ह्यात सहा वर्षे सक्तमजुरी

पुणे, पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवर येऊन महिलांना लक्ष करणे, त्यांच्या सोनसाखळ्या चोरण्याचा शहरात चोरटयानी धुमाकुळ घातला आहे. या इराणी टोळीच्या दोघांना मोक्का न्यायलयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी सहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 10 लाख 25 हजारांचा दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास एक वर्षे अतिरिक्त शिक्षा भोगण्याबाबत त्‍यांनी आदेशात नमुद करण्यात आले आहे.

जफर शाहजमान इराणी (42) आणि अमजद रमजान पठाण (39, दोघेही रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर सध्या रा. शिंदेमळा, कंजार वस्ती, वाखारी ता. दौंड, जि. पुणे) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी बाजू मांडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे चौकाजवळ रावेत पुल ते डांगे चौकाडे जाणार्‍या रस्त्यावर सुजाता शिवाजी जगताप (वय 62) आणि त्यांचे पती शिवाजी जगताप (वय 67, रा. पिंपळे सौदागर) हे दुचाकीवर जात होते. त्यावेळी स्पिड ब्रेकर आल्याने त्यानी त्यांच्या दुचाकीचा स्पीड कमी केला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या जफर आणि अमजद यांनी त्यांच्या जवळील तब्बल साडे दहा तोळ्यांचे दागिने हिसका मारून चोरून नेले. तर त्‍यांनी डांगे चौकाच्या दिशेने पोबारा केला. यानंतर त्‍याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दोघांना अटक झाल्यानंतर त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाइृ करण्यात आली. पोलिसांच्या तपासात आरोपींनी पुणे शहर, जिल्हा व अन्य जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, घरफोडी, फसवणुक असे 89 गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी साक्षीदार तपासताना दोघांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरताना दोघांनाही सहा वर्षाची शिक्षा आणि सव्वा दहा लाखांचा दंड सुनावला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

दोघेही आरोपी कोणतीही नोकरी किंवा व्यावसाय करीत नसताना 109 तोळे सोन्याचे दागिने, 62 लाखांची रोकड, 3 हजार 200 अमेरीकन डॉलर,600 पौंड वाहने व इतर वस्तु असता 1 कोटी 19 लाखांचे गबाड जफर इराणीच्या वाखारी येथील राहत्या घरातून मिळाले होते. सर्व ऐवज त्याने घरात लपवून ठेवला होता. त्याच्याकडील तपासात सर्व ऐवज जप्त करण्यात आला होते. इराणी याने त्याच्या व पत्नीच्य नावाने बँकेत खाती उघडली होती. या खात्यांवर तब्बल 56 लाख 31 हजार भरले गेले आणि 55 लाख 44 हजार काढले गेले. वाखारी येथे त्याने वडीलांच्या नावाने 21 गुंठे जमीन खरेदी केली होती.

हेही वाचा  

धोतर शीटमध्ये अडकल्याने संभाजी भिडे सायकलवरुन कोसळले; खुब्याला गंभीर दुखापत.

नागपूर : वृद्ध आईचा खून करून बेरोजगार इंजिनिअर मुलाची आत्महत्या

कल्याणमध्ये १० वर्षात दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद

Back to top button