धोतर शीटमध्ये अडकल्याने संभाजी भिडे सायकलवरुन कोसळले; खुब्याला गंभीर दुखापत | पुढारी

धोतर शीटमध्ये अडकल्याने संभाजी भिडे सायकलवरुन कोसळले; खुब्याला गंभीर दुखापत

सांगली; पुढारी वृत्तसेवा : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. ते सांगलीतील गणपती मंदिरमध्ये सायकलवरून दर्शनासाठी निघाले होते. यावेळी हा अपघात झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजी भिडे हे गणपती मंदिराकडे सायकलवरुन निघाले होते. ते गणपती मंदिरजवळ पोहोचल्यानंतर सायकलवरुन उतरत होते. त्यावेळी त्यांचे धोतर सायकलच्या शिटमध्ये अडकले. त्यामुळे ते सायकलवरून खाली कोसळले. या अपघातामध्ये त्यांच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले.

भिडे यांना उपचारासाठी सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. भिडे यांच्या अपघाताची माहिती मिळताच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकार्‍यांनी भारती हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली होती.

Back to top button