कल्याणमध्ये १० वर्षात दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद | पुढारी

कल्याणमध्ये १० वर्षात दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यांमुळे आज (दि.27 ) पुन्हा कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि आजूबाजूच्या शहरात तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी पार केली. मात्र, कल्याणमध्ये आज आत्तापर्यंतच्या सर्वाधिक 43.5 सेल्सिअस तापमानाची  (Hit) नोंद झाली. 27 एप्रिल 2019 ला कल्याण येथे 43.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पुन्हा 27 एप्रिल 2022 कल्याण येथे 43.5 तापमानाची नोंद झाली आहे. परिणामी उष्णतेच्या लाटेचा परिणाम कल्याण -डोंबिवलीत चांगलाच जाणवू लागला आहे.

पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. पश्चिमेकडून वाहणारे वारे समुद्राच्या बाजूने वाहत येतात. त्यामुळे या वाऱ्यामध्ये आर्द्रता अधिक असते ; पण तापमान मात्र कमी असते. दोन दिवसांपूर्वी जे वारे वाहत होते. ते पश्चिमेकडील तर उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढला आहे. उत्तरेकडील वारे अधिक कोरडे असल्याने हवेत उष्मा जाणवत असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

कल्याणात आज 43.5 तर डोंबिवलीत 43.3 इतक्या यंदाच्या एप्रिल महिन्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याची माहिती मोडक यांनी दिली. कल्याण डोंबिवलीप्रमाणे त्याच्या शेजारील शहरांमध्येही या उष्णतेच्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबई आदी शहरांमध्येही तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडल्याचे दिसून आले.

 Hit : उष्णता खेचून घेण्याची सिमेंट काँक्रीटचे क्षमता

सिमेंट काँक्रिट उष्णता अधिक खेचून घेते. त्यानंतर जसे वारे वाहतात तशी उष्णता त्यातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. त्यामुळे रस्त्यावरून चालताना उन्हाचे चटके अधिक जाणवतात.

इतर शहरांचे तापमान

ठाणे – 41.7
मुंब्रा आणि कोपरखैरणे – 42.3
पनवेल – 42.7
बदलापूर – 43.1
डोंबिवली – उल्हासनगर – 43.3
कल्याण – 43.5
तळोजा , भिवंडी – 43.6
पलावा – 44.5
कर्जत – 45.8

हेही वाचलंत का ? 

Back to top button