40 अंश तापमानातही नाचले अस्वल…कात्रजच्या प्राणी संग्रहालयात तोबा गर्दी | पुढारी

40 अंश तापमानातही नाचले अस्वल...कात्रजच्या प्राणी संग्रहालयात तोबा गर्दी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

रविवार पुणेकरांसाठी हॉट संडे ठरला. तापमानाचा पारा 40 अंशांवर असूनदेखील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील अस्वलाने चक्क नृत्य करून बच्चेकंपनींना रिझवल्याने त्याला पाहण्यासाठी आबालवृध्दांची तोबा गर्दी झाली होती. सकाळपासून तिकीट विक्री केंद्रावर मोठी गर्दी झाल्याने तिकिटासाठी दोन तासांचे वेटिंग पाहावयास मिळाले.

लखीमपूर खेरी हिंसाचार : आशिष मिश्राचा जामीन सुप्रीम कोर्टाकडून रद्द

रविवारच्या सुटीमुळे कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाबाहेर तिकिटांसाठी झालेली गर्दी.

नाशिक : सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार ; पोलिस आयुक्तांचे आदेश

मागच्या दोन वर्षांत उन्हाळ्यात कोरोनामुळे कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय बंद होते. मात्र, यंदा दोन वर्षांनंतर उन्हाळी सुटीत बच्चेकंपनीला या उद्यानात मनसोक्त प्राणी पाहण्याचा आनंद लुटायला मिळत आहे. गेले चार दिवस जोडून सुटी आल्याने पर्यटकांनी बच्चे-कंपनींना घेऊन प्राणिसंग्रहालयाकडे जाण्याचा बेत आखला. गुरुवार ते रविवार असे चारही दिवस प्राणिसंग्रहालयात प्रचंड गर्दी होती. रविवारी गर्दीचा उचांक झाला. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांनी सहकुटुंब भेट दिली.

आमची अयोध्या भेट हे राजकारण नव्हे तर श्रद्धा : संजय राऊत

अस्वलाने दिल्या खास पोझ

रविवारी बच्चेकंपनी डोक्यावर टोपी, हातात पाण्याची बाटली घेऊन तिकीट मिळताच प्राणिसंग्रहालयात पळत सुटले. सर्पोद्यानातील साप, अजगर, नागोबा, कासव, मगर, सुसर यांच्या पिंजर्‍यांकडे त्यांचा मोर्चा वळला. परंतु, उन्हाने सर्वच प्राणी सुस्त होते. वाघोबा, सिंह, बिबट्याने झाडांचा आडोसा घेतल्याने दूरवरूनच या प्राण्यांचे दर्शन झाले. पण, अस्वलाने मात्र बच्चेकंपनीला जाम खूष केले. तो उड्या मारतच समोर आला. त्याने दोन पायांवर उभे राहून नृत्य केल्याने मुलांच्या चेहर्‍यावर हास्य आणले. अस्वलाचे फोटो काढण्यात मग बच्चेकंपनीची स्पर्धाच लागली होती.

भोंगा प्रकरण : गृहमंत्री मुख्यमंत्र्याची भेट घेणार; कोणता निर्णय होणार? 

आइस्क्रीम खाण्यासाठी गर्दी

40 अंश तापमानातही लहान मुले प्रचंड मोठे उद्यान पायी फिरून घरी गेली. जाताना प्राणिसंग्रहालयाबाहेर आइस्क्रीम, चाटच्या गाड्यांवरही मोठी गर्दी झाली होती.

Back to top button