… अन् बिबट्याचे बछडे विसावले पुन्हा आईच्या कुशीत! | पुढारी

... अन् बिबट्याचे बछडे विसावले पुन्हा आईच्या कुशीत!

पारगाव : पुढारी वृत्तसेवा

रांजणी (ता.आंबेगाव) येथील कारमळ्यात उसतोडणी सुरु असताना आढळून आलेले दोन बिबट बछडे पुन्हा त्यांच्या आईच्या कुशीत पोहचविण्यात वनविभागाला यश आले आहे. रविवारी (दि. १७ ) रात्री साडे आठच्या सुमारास बिबट मादीने दोन्हीही बछड्यांना सुरक्षित स्थळी हलविले. हे दृश्य ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे .

शिवसेनेच्या हिंदुत्वावर राज ठाकरेंचा डोळा?, सेनेच्या असंतुष्टाना ओढण्याची खेळी

कारमळ्यातील जुनीविहीर वस्तीत सुनील बबन वाघ व सदाशिव बापू वाघ यांच्या शेतात उसाची तोड सुरू आहे. रविवारी ( दि. १७ ) सकाळी ऊसतोड कामगारांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये घबराट पसरली होती. त्यामुळे उस तोडणीचे काम थांबविण्यात आले होते. वनविभागाने घटनास्थळी जाऊन दोन्हीही बिबट बछड्यांना अवसरी घाटातील उद्यानात हलवले होते .

Table Tennis Player : तामिळनाडूमधील युवा टेबल टेनिसपटूचे अपघाती निधन, स्‍पर्धेला जाताना मेघालयमध्‍ये काळाचा घाला

रविवारी (दि . १७) रात्री वनपरिक्षेत्रअधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विजय वेलकर, वनरक्षक पी. के. पवार, वनमजूर महेश टेमगिरे यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही बिबट बछड्यांना क्रेटमध्ये ठेवले. शेजारी ट्रॅप कॅमेरा लावला. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास बिबट मादीने दोन्हीही बछड्यांना तेथून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलविले. हे दृश्य वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

MNS Vs Shivsena : राज्यात अंधभक्तांचा सुळसुळाट; मुख्यमंत्र्यांचा मनसे-भाजपाला टोला

कारमळा येथील जुनी विहीर परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. येथे काम करताना ऊस तोड कामगार, शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी. एकट्याने फिरू नये. हातात काठी, बॅटरी ठेवा असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी केले आहे.

Back to top button