‘चित्रा वाघ यांनी सुसाइड नोट लिहिण्यास भाग पाडले’

‘चित्रा वाघ यांनी सुसाइड नोट लिहिण्यास भाग पाडले’
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासह सुसाइड नोट लिहिण्यास भाग पाडल्याचा आरोप 24 वर्षीय पीडित तरुणीने केला आहे. वाघ यांनीच आपल्याला पोलिसांकडे विशिष्ट जबाब द्यायला भाग पाडले, असा गौप्यस्फोटही तिने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत केला.

'वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे असून, विशिष्ट यंत्रणा वापरून माझ्या मोबाईलवरून कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरून मला मेसेज येत आहेत, असा दावाही पीडित तरुणीने केला आहे. महंमद अहमद अंकल ऊर्फ चाचा यांना वडिलकीच्या नात्याने मी कुचिक यांच्याबरोबरचे संबंध, तसेच गरोदर असल्याची माहिती दिली. त्यांनी कुचिक यांची माहिती घेऊन त्यांचेकडे सदनिका, तसेच पैशांची मागणी करू लागले. त्या चाचांनी मागणी मान्य न केल्यास गुन्हा दाखल करण्यास सांगितले; परंतु मी त्यास विरोध केला होता,' असे तिने म्हटले आहे.

चाचा पुरवीत होता चित्रा वाघ यांना माहिती

'दुसर्‍या वेळी आजारपणाचा फायदा घेऊन त्यांनी गुन्हा दाखल करण्याबाबतचा सर्व प्रकार केला. सुरुवातीपासूनच वाघ यांचा रोख कुचिक यांच्यावर होता. चाचा सर्व माहिती वाघ यांना पुरवित होते. त्यानंतर कुचिक यांचे जनसंपर्काचे काम पाहणार्‍या रोहित भिसे व आनंद घरत हे सर्व माहिती वाघ यांना पाठविण्याचे काम करत होते. या सर्वांनी माझ्यावर दबाव आणला होता. त्यांच्याकडून मला वारंवार फोन करून तक्रार करायला सांगण्यात आले,' असेही पीडितेने सांगितले. 'तक्रार केल्यानंतर माझे अपहरण झाले होते. मात्र, ठराविक काळानंतर माझी शुध्द हरपली. जेव्हा जाग आली, तेव्हा मी एका घाटात एका चारचाकीत होते, असे ती म्हणाली.

तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई येथील पत्रकार परिषदेवेळीही लिलावती हॉस्पिटल येथेही डांबून ठेवले. त्यानंतर पत्रकार परिषदेत जबरदस्तीने बोलण्यास भाग पाडले,' असा आरोपही तिने केला. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले की, गोव्यातील प्रकार तसेच व्हॉटसअप मेसेजबाबत या तरुणीला स्टेटमेंट देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बोलविले होते. ती आज सायंकाळी पोलीस ठाण्यात आली असून तिचा जबाब नोंदविण्यात येत आहे.

विरोधकांनी पीडितेच्या वेदनांचा बाजार मांडला : गोर्‍हे

'आपण स्वतःच न्याय आणि तपास यंत्रणा आहोत, असे बोलत सुटले तर काय होते, हे आता समोर आले आहे. कथित बलात्कार प्रकरणातील मुलीला न्याय मिळवून देण्यापेक्षा राजकीय द्वेषापोटी तिच्या जखमांचा, वेदनांचा विरोधकांनी बाजार मांडला,' अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर पत्रकार परिषदेत केली.

त्या म्हणाल्या, 'विरोधकांकडून दिशाभूल करण्याचे वातावरण तयार केले गेले. पीडितेला कोणीच मदत केली नाही हा आरोप चुकीचा आहे. 25 फेब्रुवारीला पीडित मुलीचा मला फोन आला, तिच्याशी मी 25 ते 30 मिनिटे बोलले. त्यानंतर तिच्या इच्छेनुसार तक्रारीसाठी स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधला होता.'नंतरच्या काळात न्यायापेक्षा पीडितेच्या जखमांचे भांडवल केले गेले,'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news