पुणे : शाखा अभियंत्यांसमोर कंत्राटी कामगार-वायरमनची रंगली ‘फ्री स्टाईल’ | पुढारी

पुणे : शाखा अभियंत्यांसमोर कंत्राटी कामगार-वायरमनची रंगली ‘फ्री स्टाईल’

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव येथील महावितरणच्या दोन शाखा अभियंत्यांसमोर वीज वितरण कंपनीचा कंत्राटी कामगार व स्थानिक वायरमन या दोघात नारायणगाव टोमॅटो उपबजारात फ्री स्टाईल  (‘Freestyle’) हाणामारी झाली. कंत्राटी कामगार सुनील जाधव व वायरमन रामदास बांबळे यांच्यात ९ एप्रिलरोजी दुपारी एक वाजता ही मारामारी झाली. दोन्ही कर्मचाऱ्यांनी परस्पर विरोधी तक्रारी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिल्याचे सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सांगितले.

(‘Freestyle’)  कंत्राटी कामगार हा स्वतः च्या घरातील वीज मीटरमधून चोरी करत असून वीज ग्राहकांना सुध्दा वीज चोरीसाठी मदत करत असल्याची तक्रार वायरमनने महावितरणचे वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्याने ही हाणामारी झाली फ्री स्टाईल कुस्तीचा आनंद उपबजार आवारातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी घेतला. याबाबचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या कुस्तीची जोरदार चर्चा सुरू झाली.

वायरमन बांबळे हे ग्राहकांची फसवणूक करतात, निवासस्थानी रहात नाहीत, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नाहीत, सायंकाळी फोन बंद करून गावी निघून जातात, असा तक्रार अर्ज सुमारे शंभर ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे पंधरा दिवसांपूर्वी केला होता. हा तक्रार अर्ज जाधव यांनी पुढाकार घेऊन केला असल्याचा संशय बांबळे यांना होता.

जाधव हे वीज बिलाची थकबाकी असताना बेकायदेशीर वीजजोड देणे, आपल्या कार्यक्षेत्रात परस्पर वीज मीटर बसवणे, नवीन कनेक्शन सर्वे रिपोर्टवर बेकायदा सही करणे तसेच स्वतः वीज चोरी कऱतात, अशी तक्रार वायरमन बांबळे यांनी ८ एप्रिल २०२२ रोजी महावितरण कंपनीच्या येथील कार्यालयात केली होती. ९ एप्रिल २०२२ रोजी जाधव यांच्या घरातील वीज मीटरची तपासणी केली असता जाधव यांनी वीज चोरी केल्याचे आढळून आले असून त्यांना वीज बिलाची तडजोड रक्कम भरण्यास सांगितले आहे, अशी माहिती शाखा अभियंता बनसोडे यांनी दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button