पुणे : खेड शिवापूर टोलनाका : व्ही. के. एंटरप्राइजेसला मुदतवाढ | पुढारी

पुणे : खेड शिवापूर टोलनाका : व्ही. के. एंटरप्राइजेसला मुदतवाढ

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा

पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोलनाक्यावरील टोल वसुली करणाऱ्या व्ही. के. एंटरप्राइजेस या कंपनीला पुन्हा एकदा एक वर्षाची मुदतवाढ मिळाली असल्याचे व्ही. के. एंटरप्राइजेसचे नवनाथ पारगे व विजय कटके यांनी सांगितले. याला पीएसआरटीएल (पुणे-सातारा टोल रोड कंपनी) कंपनीने दुजोरा दिला आहे.

श्रीनगर : सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; जवान शहीद, एक गंभीर जखमी

खेड शिवापूर टोलनाक्यावर व्ही. के. एंटरप्राइजेस ही कंपनी १ एप्रिल २०२१ पासून टोल वसुलीचे व्यवस्थापन सांभाळत आहेत. ३१ मार्च २०२२ पर्यंत त्यांची मुदत होती. गेले वर्षभर या कंपनीने अत्यंत नियोजनबद्ध, सौजन्याने, तसेच प्रवाशांची कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता सचोटीने टोल वसुलीचे काम केले आहे. त्यामुळे पीएसआरटीएल कंपनीने पुन्हा एकदा व्ही. के. एंटरप्राइजेस या कंपनीला टोल व्यवस्थापन करण्याची संधी दिली आहे. ही मुदत १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत आहे.

पाकिस्तान, श्रीलंकेतील हाल पाहून पीएम मोदी ॲक्टीव्ह; भारतावर परिणाम होण्याची भीती

गेल्या वर्षभरामध्ये खेड-शिवापूर टोल नाक्यावर प्रवाशांचा जो वेळ जात होता, तो वेळ आमच्या व्यवस्थापनाच्या कामगिरीने कमी झाला आहे. इतरही गैरसोय टाळून एक चांगलं टोलवसुलीचे व्यवस्थापन आमच्या कंपनीने केले आहे. यापुढे देखील प्रवाशांसोबत नम्रतेने वागूनच टोल वसुली व्यवस्थापन केले जाईल

                                                    – नवनाथ पारगे, मालक, व्ही. के. एंटरप्राइजेस

गेल्या वर्षभरात अगोदरच्या तुलनेत व्ही. के. एंटरप्राइजेस ही कंपनी व्यवस्थितरीत्या काम करीत आहे. टोल नाक्यावर कोणताही वाद झाला नाही ही जमेची बाजू आहे. या बाबी लक्षात घेता त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

                                               – अमित भाटिया, व्यवस्थापक, रिलायन्स इन्फ्रा

हेही वाचा

लखीमपूर खिरी प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

चंद्रपूर : तरुणीचा शिरच्छेद केलेला नग्नावस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ

नवाझ शरीफांना शिक्षा सुनावणारे न्‍यायमूर्ती होणार काळजीवाहू पंतप्रधान : इम्रान खान यांच्‍या पक्षाचा प्रस्‍ताव

Back to top button