श्रीनगर : सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; जवान शहीद, एक गंभीर जखमी | पुढारी

श्रीनगर : सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; जवान शहीद, एक गंभीर जखमी

श्रीनगर, पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील मैसुमा भागात सोमवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्‍या (CRPF) तुकडीवर दहशतवाद्‍यांनी हल्‍ला केला. यामध्‍ये एक जवान शहीद झाला, तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे.

या हल्‍ल्‍याबाबत माहिती देताना सीआरपीएफच्‍या अधिकार्‍यांनी सांगितले की, “दहशतवाद्यांनी मैसुमा येथे सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केला . त्यात दोन जवान जखमी झाले होते.जखमी जवानांना तातडीने SMHS रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका जवानाचा उपचारापूर्वीच मृत्‍यू झाला.  दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे”.

रविवारीच जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील (LOC) एका गावातून भारतीय लष्कर आणि विशेष ऑपरेशन ग्रुप (SOG) यांच्याकडूनसंयुक्त कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता. रविवारी पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मूळचे बिहारचे दाेन कामगार जखमी झाले होते.

हे वाचलंत का? 

Back to top button