

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन
पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केली आहे. त्यामुळे आता काळजीवाहू पंतप्रधान म्हणून अजमत सईद यांचे नाव आघाडीवर आहे. इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाने काळजीवाहू पंतप्रधान म्हणून माजी न्यायमूर्ती अजमत सईद यांचे नाव सूचवले आहे. पाकिस्तान घटनेतील अनुच्छेद २२४ नुसार , १५ दिवसांसाठी एखाद्याची देशाच्या काळजीवाहू पंतप्रधानपदी नियुक्ती करता येते. मात्र त्यांना निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार असत नाही. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण हे घटनेसंदर्भातील आहेत. त्यामुळे घाईगडबडीमध्ये कोणताही निर्णय देता येणार नाही, असे स्पष्ट करत मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता यावर पुन्हा सुनावणी होईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.
यापूर्वी १५ दिवसांसाठी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनीच काम पाहावे, असा आदेश राष्ट्रपतींनी दिला होता. मात्र इम्रान खान यांचा पक्ष तहरीक-ए-इन्साफने काळजीवाहू पंतप्रधान म्हणून माजी न्यायमूर्ती अजमत सईद यांचे नाव सूचवले आहे. पनामा पेपर लीक प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दोषी ठरविणार्या सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठामध्ये सईद सदस्य होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर पाकिस्तान सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. संसदेमध्ये घडलेल्या घटनांची समीक्षा होणे आवश्यक आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले. तसेच याप्रकरणाची सुनावणी व्यापक खंडपीठासमोर व्हावी, ही विरोधी पक्षांच्या वतीने करण्यात आली मागणी फेटाळत कोर्टाने विरोधी पक्षांना फटकारले. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण हे घटनेसंदर्भातील आहेत. त्यामुळे घाईगडबडीमध्ये कोणताही निर्णय देता येणार नाही, असे स्पष्ट करत मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता यावर पुन्हा सुनावणी होईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.
अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकांवर व्यापक खंडपीठासमोरच सुनावणी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षाचे नेते बिलावल भुट्टो यांच्या वकिलांनी यावेळी केली. तुम्ही सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या विशेष खंडपीठवरच सवाल केला तर आम्ही सुनावणी थांबवू, असा इशारा सुप्रीम कोर्टाने बिलावल भुट्टो यांच्या वकिलांना दिले. तसेच तुम्ही येथे राजकीय भाषा करु नका, व्यापक खंडपीठाच्या स्थापनेमुळे अन्य खटल्यांच्या सुनावणीवर परिणाम होतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
हेही वाचलं का?