पुणे : जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी केशरबाई पवार; राहुल दिवेकर उपाध्यक्ष | पुढारी

पुणे : जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी केशरबाई पवार; राहुल दिवेकर उपाध्यक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज दूध) अध्यक्षपदी केशरबाई पवार (शिरूर) आणि उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर (दौंड) यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँगेसने जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपद प्रथमच महिलेला दिले आहे.

ग्राहकांना फटका; सीएनजी २.५ रुपयांनी महागला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलने १६ पैकी १५ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी रविवारी (दि.३) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत सर्किट हाऊस येथे इच्छुक संचालकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्वमान्य असेल, अशी भूमिका नवनिर्वाचित संचालकांनी या बैठकीत घेतली होती.

पेट्रोल, डिझेल दरात प्रत्येकी ४० पैशांची वाढ, १४ दिवसांत इंधन दरात ८.४० रुपये वाढ

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षश्रेष्ठींनी दिलेली नांवे सोमवारी संचालकांसमोर सांगितली. सोमवारी (दि.४) संघाच्या मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलींद सोबले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी सकाळी साडे अकरा वाजता अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचे कामकाज सुरू केले. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी केशरबाई पवार (शिरूर) आणि उपाध्यक्षपदासाठी राहुल दिवेकर (दौंड) यांचे एकमेव अर्ज आले. त्यामुळे दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध घोषित केली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

मोठी बातमी! एचडीएफसी हाऊसिंग फायनान्सचं HDFC बँकेत विलीनीकरण

अध्यक्षपदाच्या पहिल्या महिला मानकरी

कात्रज दूध संघाच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून केशरबाई पवार यांनी काम पाहिले. आता अध्यक्ष पदावर पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून पवार यांच्यावरच पक्षश्रेष्ठींनी विश्वास दर्शविला आहे. कात्रज दूध संघावर त्या चौथ्यादा विजयी झाल्या आहेत. तर राहुल दिवेकर हे प्रथमच विजयी झाले असून, पहिल्याच निवडणुकीत उपाध्यक्षपद मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. यानिमित्ताने पक्षाने बारामती लोकसभा मतदार संघात दौंडला उपाध्यक्षपद देऊन पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे.

नवाझ शरीफ यांच्‍या लंडनमधील कार्यालयावर हल्‍ला, तिघे जखमी

दरम्यान, पदासाठी प्रबळ दावेदार असलेले आणि तिसऱ्यांदा विजयी झालेले भगवान पासलकर (वेल्हे) यांचा विचार पक्षश्रेष्ठींनी केलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हवेली तालुक्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पराभवामुळे असलेल्या नाराजीमुळे कोणतेच पद न देता दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत असल्याची कुजबुज निवडीनंतर ऐकावयास मिळाली.

Back to top button