ग्राहकांना फटका; सीएनजी २.५ रुपयांनी महागला | पुढारी

ग्राहकांना फटका; सीएनजी २.५ रुपयांनी महागला

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ही दरवाढ सुरू असताना इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (आयजीएल) सोमवारी (दि.४) रोजी दिल्लीतील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसची (सीएनजी) किंमत प्रति किलो २.५ रुपयांनी वाढविली आहे. या दरवाढीनंतर दिल्लीत सीएनजीचे नवीन दर प्रति किलोमागे ६४.११ रुपये झाले आहेत.

विशेष म्हणजे, शुक्रवारी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडकडून देशांतर्गत पीएनजी आणि सीएनजी गॅसच्या किंमती वाढविण्यात आल्या होत्या. सीएनजी दरात ८० पैसे तर, पीएनजी दरात ५.८५ रुपये प्रति घनमीटर म्हणजे १६.५ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.

यापूर्वी २४ मार्चला देखील पीएनजी दर १ रुपयांनी वाढविण्यात आले होते. गेल्या महिन्याभरात CNG आणि पीएनजी दरात सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे. नवीन दरवाढीनंतर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नोएडात सीएनजी ६६.८८ रुपये आणि मुजफ्फरनगर, मेरठमध्ये ७१.३६ रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button