

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरुच असून, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल दरात प्रत्येकी ४० पैशांची वाढ केली. या दरवाढीनंतर मुंबईतील डिझेलचा दर प्रती लिटर १०३ रुपयांच्या पुढे गेले आहेत.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर शंभर डॉलर्स प्रती बॅरलपर्यंत खाली आले असले तरी इंधन दरातील वाढ मात्र सुरुच आहे. गेल्या १४ दिवसांत इंधन दरात १२ वेळा वाढ झालेली आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल १०३.८१, तर डीझेल ९५.०७ रुपयांवर गेले आहे. मुंबईत हेच दर क्रमशः ११८.८३ आणि १०३.०७ रुपयांवर गेले आहेत. चारही महानगरांमध्ये मुंबईत इंधनदर सर्वाधिक आहेत. तामिळनाडूतील चेन्नई येथे पेट्रोल १०९.३४ रुपयांवर तर डिझेल ९९.४२रुपयांवर गेले आहे. गेल्या १४ दिवसांमध्ये पेट्रोल दरात झालेली वाढ ८.४० रुपये इतकी आहे.
हेही वाचलं का?