मोठी बातमी! एचडीएफसी हाऊसिंग फायनान्सचं HDFC बँकेत विलीनीकरण | पुढारी

मोठी बातमी! एचडीएफसी हाऊसिंग फायनान्सचं HDFC बँकेत विलीनीकरण

बंगळूर; पुढारी ऑनलाईन

एचडीएफसी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड आता HDFC बँकेत विलीन होणार आहे. एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) एचडीएफसीची (HDFC) ४१ टक्के भागिदारी असणार आहे. Housing Development Finance Corporation Limited ने सोमवारी सांगितले की, आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत HDFC चे HDFC बँकेत विलीनीकरणास मंजुरी देण्यात आली आहे. विलीनीकरणामध्ये कंपनीचे शेयरहोल्डर्स आणि क्रेडिटर्स (कर्ज घेणारे) यांचाही समावेश असेल.

विलीनीकरण करारानुसार, HDFC Ltd चे २५ शेअर्स असणाऱ्या शेयरहोल्डर्संना एचडीएफसी बँकेचे ४२ शेअर्स मिळतील. एचडीएफसी लिमिटेडचे विद्यमान शेअरहोल्डर्स एचडीएफसी बँकेच्या ४१ टक्के मालकीचे असतील.

एचडीएफसी लिमिटेडच्या सहाय्यक आणि सहयोगी कंपन्या एचडीएफसी बँकेत समाविष्ट होतील, असे रेग्युलटरी फायलिंगमध्ये नमूद केले आहे. एचडीएफसी लिमिटेडचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी हे समसमान विलीनीकरण असल्याचे म्हटले आहे. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा मिळेल तसेच गृहनिर्माण वित्तपुरवठा व्यवसायाला मोठी चालना मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button