पुणे : अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग, बस कंडक्टरला अटक | पुढारी

पुणे : अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग, बस कंडक्टरला अटक

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : ‘पीएमपीएल’ बस प्रवासावेळी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी बस कंडक्टरला अटक केली. प्रशांत किसन गोडवे (वय. ३०, रा. जि. पुणे, कात्रज कोंढवा रोड कात्रज) असे अटक केलेल्‍या संशयित आराेपीचे नाव आहे. त्‍याच्‍यावर गोडवे याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीनं सर्वसामान्यांना घाम फोडला; सात दिवसांत ४.८० रुपयांनी महागले

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२८) सकाळी साडेअकराच्या सुमारास पीडित मुलगी बसने विस्डेन्ड थिएटर ते विश्रांतवाडी असा प्रवास करत  हाेती.  ती बसमध्ये उभी राहिली असताना बसकंडक्टर प्रशांत गोडवे तिच्या जवळ खेटून उभा राहिला. मुलीने  दुसरीकडे उभा राहण्यास जागा नाही का? असे रागावून म्हटले. दरम्यान, तिकीट चेक करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे संबंधित कंडक्टरची तक्रार देखील केली. याचा राग मनात धरून संशयित आरोपीने फिर्यादी मुलीसोबत मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी कंडक्टरला अटक केली आहे.

हेही वाचलं  का? 

Back to top button