russia-ukraine war : खार्कोव्हवर २४ तासांत २०० हवाई हल्ले

रशियन हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये 25 लाखांवर लोकांचे देशांतर्गत विस्थापन झाले आहे आणि 5 हजारांवर रहिवासी इमारती नेस्तनाबूत झाल्या आहेत, असे संयुक्त राष्ट्रांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.
रशियन हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये 25 लाखांवर लोकांचे देशांतर्गत विस्थापन झाले आहे आणि 5 हजारांवर रहिवासी इमारती नेस्तनाबूत झाल्या आहेत, असे संयुक्त राष्ट्रांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.

कीव्ह / मॉस्को; वृत्तसंस्था : 33 दिवसांपासून युक्रेन-रशिया युद्ध (russia-ukraine war) सुरू आहे. गेल्या 24 तासांत खार्कोव्हवर रशियाने 200 वर हवाई हल्ले केले आहेत. रशियन हल्ल्यांत आजवर 143 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे, तर 216 हून अधिक मुले जखमी झाली आहेत, असे युक्रेनतर्फे सोमवारी सांगण्यात आले.

कोरियाच्या धर्तीवर युक्रेनचे पूर्व युक्रेन आणि पश्चिम युक्रेन (russia-ukraine war) असे विभाजन करण्याचा रशियाचा डाव आहे, असा दावा युक्रेन संरक्षण गुप्तवार्ता विभागाने केला आहे. रशियाला आपल्या सीमेपासून ते क्रिमियापर्यंत 'लँड कॉरिडोर' बनवायचा आहे. हा हेतूही या युद्धाच्या माध्यमातून रशिया तडीस नेऊ पाहत आहे, असेही या विभागाने म्हटले आहे.

युक्रेनमधील (russia-ukraine war) शहरांवर रशियन हल्ले सुरू असतानाच दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची तुर्कस्तानातील इस्तंबूल शहरात शांतता बैठकीची चौथी फेरी सुरू झाली आहे. आजवर 28 फेब्रुवारी, 1 मार्च आणि 7 मार्च या तारखांना क्रमश: तीन फेर्‍या दोन्ही देशांदरम्यान झाल्या आहेत.

युक्रेनमधील लीव्ह, खार्कोव्ह, कीव्ह, खारसेन ही 5 महानगरे उद्ध्वस्त झालेली आहेत. याउपरही युक्रेनचे मनोधैर्य स्थिर आहे. आम्हाला शांतता हवी आहे; पण त्याबदल्यात व्लादिमीर पुतीन यांच्या अटी-शर्तींवर मात्र आम्ही कदापि तह करणार नाही, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे.

सहापैकी चार मुद्द्यांवर रशिया आणि युक्रेनमध्ये सहमती झालेली आहे. युक्रेन 'नाटो'त सहभागी होणार नाही, ही रशियाची अटही युक्रेनने मान्य केली आहे.
– तय्यप अर्दोगॉन,
राष्ट्राध्यक्ष, तुर्कस्तान

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news