पुणे : इंदापूर पोलिसांची अवैध गुटख्यावर कारवाई; २० लाखांचा माल पकडला | पुढारी

पुणे : इंदापूर पोलिसांची अवैध गुटख्यावर कारवाई; २० लाखांचा माल पकडला

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

इंदापूर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करून २० लाखांच्या गुटख्यासह ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हा टेम्पो सोलापूरकडून पुणेकडे निघाला होता. या वाहनात अवैध गुटखा असल्याची गोपनीय माहिती इंदापूर पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.१८) ही कारवाई करण्यात आली.

आता ओमायक्रॉनच्या नव्या stealth व्हेरिएंटची दहशत; दक्षिण कोरिया, पश्चिम युरोपमध्ये हाहाकार

गस्ती दरम्यान गाड्यांची तपासणी करताना आयशर टेंपो (एके ०१ एएल ९१२१) अडवून तपासणी केली असता यामध्ये आर. के. कंपनीचा गुटखा मिळून आला. इंदापूर पोलिसांनी या वाहनाला ताब्यात घेतले आहे. इंदापूर पोलिसांचीही मोठी कारवाई असून, इंदापूर पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या नेतृत्वाखाली अवैध गुटख्यावर चार महिन्यातील चौथी मोठी कारवाई आहे.

तर मुलीला वडिलांकडून आर्थिक मदत घेण्याचा अधिकार नाही : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

यामध्ये एकूण मोठी ४५ खोकी म्हणजे २० लाख रुपये किमतीचा गुटखा आणि १० लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले आहे. वाहन चालक व मालक यांविरूद्ध इंदापूर पोलिसांत भा.द.वी.क. ३२८ व इतर कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली. पोलिस निरीक्षक टी. वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश माने , नागनाथ पाटील, दत्तात्रेय लिगडे, सुधीर पाडुळे, पोलीस नाईक सलमान खान, बापु मोहिते, मोहम्मदअली मड्डी, विकास राखुंडे, विनोद काळे, मोहळे आदीनी ही कारवाई केली.

हेही वाचा

WIvsBAN : विंडिजचा बांगलादेशवर ४ धावांनी रोमांचक विजय!

गांधी कुटुंबातील सदस्याला पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवता येते का ? नियम काय सांगतात..

IPL 2022 : केएल राहुलच्या ‘लखनऊ’ संघाला मोठा झटका, ‘हा’ खेळाडू IPL मधून बाहेर!

Back to top button