बारामती : ब्रेकर लावून फोडला पारवडी येथील बंधारा; माथेफिरूंचे कृत्य | पुढारी

बारामती : ब्रेकर लावून फोडला पारवडी येथील बंधारा; माथेफिरूंचे कृत्य

बारामती : पुढारी वृत्तसेवा

जलयुक्त शिवार योजनेतून पारवडी (ता. बारामती) येथे सन 2015-16 मध्ये बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा काही माथेफिरूंनी ब्रेकर लावून फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीसाठा कमी झाल्याने शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. बंधारा फोडणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी तहसील व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे केली आहे. स्वप्निल पांडुरंग खंडागळे, संदीप दत्तू गावडे, जयश्री पांडुरंग खंडागळे, विकास बबन गावडे, आप्पा गंगाराम गावडे आदी बारा शेतकर्‍यांनी यासंबंधीचे निवेदन दिले आहे.

लखीमपूर खिरी प्रकरण : आशिष मिश्राचा जामीन का रद्द केला जाऊ नये : सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

एप्रिल, मे महिन्यांतही बंधार्‍यात पाणीसाठा राहत असल्याने परिसरातील शेतकर्‍यांच्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटत होता. या पाण्यामुळे लगतच्या विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी वाढत होती. 12 व 13 मार्च रोजी गावातील काहींनी हा बंधारा ब्रेकरच्या साहाय्याने मध्यभागी फोडला. शासनाचे 30 ते 40 लाख रुपये यामुळे पाण्यात गेले. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. या बंधार्‍यामुळे संबंधितांचे काहीही नुकसान होत नसताना बंधारा का फोडण्यात आला, असा सवाल शेतकर्‍यांनी केला आहे. बंधारा फोडणार्‍यांवर कारवाई करावी. याप्रकरणी शासनाचा झालेला खर्च वसूल करावा; अन्यथा 1 एप्रिलपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

दिशा सॅलियान प्रकरण : नारायण राणे, नितेश राणे यांना जामीन मंजूर

बंधार्‍यातील पाझरामुळे शेतजमिनींचे नुकसान होत असल्याचे काही शेतकर्‍यांचे म्हणणे होते. परंतु, बंधारा फोडल्याबाबत माहिती नाही. कृषी विभागाने बंधारा उभारणी करून तो ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केला आहे. त्यामुळे बंधार्‍यासंबंधी कोणत्याही बाबी करायच्या झाल्या, तर संबंधितांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेणे अपेक्षित होते. पाणी पाझरामुळे होत असलेल्या नुकसानीबाबत आमच्या कार्यालयाकडून लघु पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार झालेला आहे.
                                                 – सुप्रिया बांदल, तालुका कृषी अधिकारी, बारामती

हेही वाचा

रश्मी शुक्‍ला यांचा कुलाबा पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यास सुरुवात

नाशिकमध्ये पोलिस चौकीतच पोलिसांची मद्यपार्टी (Video)

प्रमोद सावंत हेच पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री?; पंतप्रधानांनी ट्विट केला फोटो

Back to top button