पुणे : जिल्हा परिदेचे 14 गट आरक्षित होणार

पुणे : जिल्हा परिदेचे 14 गट आरक्षित होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद गट आणि गण प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला असून, या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होत आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूत्रानुसार, जिल्ह्यातील 82 गटांपैकी आठ गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, तर सहा गट हे अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित होणार आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुका वेळेत झाल्या नाहीत. परिणामी सध्या दोन्ही ठिकाणी प्रशासक राज आहे. त्यातच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुकांची प्रक्रिया जाहीर करा, असे आदेश दिले. राज्य निवडणूक आयोग खडबडून जागे झाले आहे. त्यानंतर आयोगाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यांच्या प्रारूप रचनेपासून ते अंतिम रचनेचा कार्यक्रम तारीखनिहाय जाहीर केला आहे.

पुणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्र असलेल्या ग्रामीण क्षेत्रातील एकूण लोकसंख्या 33 लाख 48 हजार 495 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे तीन लाख 14 हजार 776, तर अनुसूचित जमातीसाठीचे दोन लाख 51 हजार 445 नागरिक आहेत.

असे आहे सूत्र

जिल्ह्यातील एकूण ग्रामीण लोकसंख्येने भागले जाईल. त्यानंतर येणार्‍या गुणोत्तराला एकूण गट संख्येने गुणले जाईल. त्यानंतर येणारा आकडा त्या प्रवर्गासाठी आरक्षित गटांचा असेल. या सूत्राप्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 7.70 म्हणजेच 8 तर अनुसूचित जमातीसाठी 6.15 म्हणजेच 6 जागा निश्चित होत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news