इंदापूर : फडणवीसांची चाैकशी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपची निदर्शने | पुढारी

इंदापूर : फडणवीसांची चाैकशी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपची निदर्शने

पुढारी वृत्तसेवा, इंदापूर (पुणे)
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर रविवारी (दि.१३) इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यानंतर त्‍यांनी इंदापूर पोलिसांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना पाठविण्यात आलेली नोटीस ही बेकायदेशीर आहे. ईडी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री व नेत्यांचे बरेच घोटाळे उघडकीस आणत आहेत. अशा नोटीसा पाठवून, भाजप नेत्यांना नामोहरण करण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी सरकार सुडबुध्दीचे राजकारण करत आहे, असा आरोपही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार, मारुती वनवे, कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा, माजी सभापती विलास वाघमोडे, गटनेते कैलास कदम, शहराध्यक्ष शकिल सय्यद, इंदापूर अर्बनचे चेअरमन देवराज जाधव, माजी नगरसेवक गोरख शिंदे, सुनिल आरगडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे यांसह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलं का ?

Back to top button