गोवा विधानसभा निवडणूक : ‘पैसे न देता जिंकता येते’ हे आरजीने दाखविले ; मनोज परब

गोवा विधानसभा निवडणूक : ‘पैसे न देता जिंकता येते’ हे आरजीने दाखविले ; मनोज परब
Published on
Updated on

पणजी : विलास ओहाळ
विधानसभा निवडणुकीपूर्वी रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी) या युवकांच्या पक्षाची दखल घेण्याचे अनेकांनी टाळले. पक्ष असो किंवा समाज माध्यमातूनही आमच्या पक्षाची दखल घेतली गेली नव्हती. परंतु केवळ पैशानेच निवडणुका जिंकता येत नाहीत, तर एक विचारसुद्धा निवडणूक जिंकून दाखवितो, हे 'आरजी'ने विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. आमचा पक्ष कोणाच्याही पोटावर मारणारा नाही कायदेशीररित्या राहणार्‍या मजुरालाही आम्ही स्वीकारले आहे. आरजीची प्रतिमा ज्या पद्धतीने रंगवली गेली ते चुकीचे आहे. आगामी पंचायत निवडणुका आम्ही फार गांभीर्याने लढविणार असल्याचे रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे प्रमुख मनोज परब यांनी दैनिक पुढारी ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

विधानसभा निवडणुकीत सांत आंद्रे मतदारसंघातून आरजीचे वीरेश बोरकर या युवकाने निसटता विजय मिळविला. फार कमी मताने विजय मिळाला असला तरी आरजी या नवख्या पक्षाने विधानसभेत चंचुप्रवेश केला आहे. या चंचुप्रवेशाची सध्या देशपातळीवरही दखल घेतली गेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर परब यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी परब यांनी अनेक विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

परब म्हणतात, आम्ही युवकांची फळी निर्माण केली. आतापर्यंत विविध पक्षांच्या दावणीला बांधली गेलेली युवकांची फळी वेगळी केली आणि गोव्यातील जनतेचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी चळवळ उभारली. गोव्यातील जनतेला काय हवे, त्यांच्या समस्या काय आहेत ? येथील युवकांच्या का समस्या काय आहेत ? व्यावसायिकांच्या समस्या काय आहेत? शेतकर्‍यांचे कोणते प्रश्न आहेत? महिलांच्या समस्या काय आहेत? या सर्वांचा विचार आणि अभ्यास करून त्यांचा निपटारा कसा करता येईल हे आम्ही निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले आहे. त्यामुळेच अनेकांना जाहीरनामा पसंत पडल्यानेच लोकांनी आमच्या उमेदवारांना मते दिली. पहिल्याच प्रयत्नात आमचा एक आमदार निवडून येणे, आम्हा सर्वांसाठी अभिमानाची नव्हे तर गोमंतकीयांसाठीही महत्त्वाची बाब आहे. भविष्यात आम्ही कोणाशीही युती करणार नाही, याच उद्देशाने वाटचाल करणार आहोत. चांगले ध्येय ठेवल्यास बदल घडतो, हे मतदारांनीच दाखविले आहे. अचानक सर्व बदल होणार नाही; पण आपल्याला भविष्यातील ते चित्र दिसत आहे.

व्यवस्थेतील बदल काळाची गरज

एम.एसस्सी शिकून मला नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे आपण स्वतःचे घर बांधू शकलो नाही. अशी अनेक कुटुंब आहेत, ही व्यवस्थेमुळे घडलेले आहे आणि ती बदलाची आवश्यकता आहे. येथील शैक्षणिक व्यवस्थेत बदलाची गरज आहे. आजही आयटीआयमध्ये जुनेच कोर्स शिकविले जातात, नव्या युगातील तांत्रिक ज्ञानाचे कोर्स शिकविणे गरजेचे आहे, तरच ते व्यवसाय करू शकतात. राज्यात ग्रामीण भागात अनेक लघु व्यवसाय सुरू करणे शक्य आहेत. तेथे तयार होणार्‍या पदार्थांना विक्रीचे स्थान निर्माण करून दिले तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत सुधार होऊ शकतो. लघुउद्योगांना प्राधान्य दिले गेले पाहिजे, असे आपणास वाटते. केंद्रातून येणार्‍या अनुदानाचा योग्य रितीने वापर होणेही अपेक्षित असल्याचे मनोज परब यांनी नमूद केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष

पक्षाचा विस्तार करावयाचा असल्यास स्थानिक व ग्रामीण भागातील प्रश्‍नांना सोडवणूक करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार आहोत. त्याशिवाय पक्षाने यापूर्वी दोनवेळा आवाज उठविल्यानेच अनेक नावे मतदारयाद्यांतून वगळण्यात आल्याची आठवण त्यांनी सांगितली. कायदेशीर जे राहातात त्यांना कशाला कोण त्रास देणार; पण बेकायदेशीररित्या राहून येथील लोकांवर केली जाणारी दादागिरी कशी खपवून घ्यायची, हा प्रश्‍न आहेच. आता आमचा ग्रामपंचायतीतील राजकारण सुधारण्याकडे भर राहणार आहे. चांगले उमेदवार आणि चांगले ध्येय ठेवल्यास बदल घडतो, हे मतदारांनीच दाखविले आहे. अचानक सर्व बदल होणार नाही; पण आपल्याला भविष्यातील ते चित्र दिसत आहे.

व्यवस्थेतील बदल काळाची गरज

एम.एसस्सी शिकून मला नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे आपण स्वतःचे घर बांधू शकलो नाही. अशी अनेक कुटुंब आहेत, ही व्यवस्थेमुळे घडलेले आहे आणि ती बदलाची आवश्यकता आहे. येथील शैक्षणिक व्यवस्थेत बदलाची गरज आहे. आजही आयटीआयमध्ये जुनेच कोर्स शिकविले जातात, नव्या युगातील तांत्रिक ज्ञानाचे कोर्स शिकविणे गरजेचे

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news