पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग तीनचाच असेल, अजित पवार यांची स्पष्टोक्ती | पुढारी

पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग तीनचाच असेल, अजित पवार यांची स्पष्टोक्ती

पुणे पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग दोनचा असेल की तीनचा असेल अशा अनेक विविध चर्चा कार्यकर्ते सर्वत्र करत आहेत, पण प्रभाग हा तीनचाच असेल. निवडणूक सहा महिने पुढे गेली असे समजू नका केव्हाही लागेल, तेव्हा कामे सुरू ठेवा असे या आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

शिवणे-नांदेड गाव पुलाचे उद्घाटन लोकार्पण समारंभात पवार बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळणे गरजेचे आहे. सध्या अधिवेशन सूरू आहे. तुम्ही गाफील राहू नका, सहा महिने नाही तर केव्हाही निवडणूका लागतील. नंतर मला दोष देऊ नका.

उड्डाणपूल, रस्ते ही विकास कामे महत्त्वाची आहेत. पंजाब राज्याचा निकाल काय लागला हे पहावे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतील मंडळी या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यामुळे जनता काहीही करू शकते. आपली कामे विश्वासाने करावी असेही पवार यांनी स्पष्ट केले.

शिवणे येथे जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या शिवणे नांदेड गाव पुलाचे उद्घाटन लोकार्पण तसेच विविध विकासकामाचे उदघाट पवार यांच्या हस्ते यावेळी झाले.

हेही वाचा

Back to top button