पुणे : कावळ पिंपरी येथील खून प्रकरणी दोन जण ताब्यात | पुढारी

पुणे : कावळ पिंपरी येथील खून प्रकरणी दोन जण ताब्यात

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा

कावळ पिंपरी (ता. जुन्नर) या ठिकाणी धारदार शस्त्राने वार करून रोहिदास पाबळे याचा खून करण्यात आल्या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

कालच्या विजयानंतर आज मोदींचा थेट गुजरातमध्ये जाऊन रोड शो !

दिलीप रामा आटोळे (रा. जांबुत, ता. शिरूर), सागर बंडू पाबळे (रा. कावळ पिंपरी, ता जुन्नर), दत्ता भाकरे व त्याचे इतर ४ साथीदार असे या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे; तर बाकी आरोपी फरार आहेत. याबाबतची फिर्याद मृत रोहिदास यांची पत्नी वनीता रोहिदास पाबळे (वय २९, रा. कावळ पिंपरी, ता. जुन्नर) यांनी दिली आहे.

Maharashtra Budget : महाराष्ट्र एक ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेलं देशातलं पहिलं राज्य ठरेल : अजित पवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. ९) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पूर्वीच्या भांडणाचा वाद मनात धरून असलेल्या दिलीप रामा आटोळे व सागर बंडू पाबळे यांच्या सांगण्यावरून दत्ता भाकरे व त्याचे इतर ४ साथीदारांनी फिर्यादी यांच्या कावळ पिंपरी येथील राहत्या घराच्या पाठीमागे संगनमत करून रोहिदास यांच्या डोक्यात, अंगावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. यावरून नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक ताटे करीत आहेत.

हेही वाचा

महाराष्ट्र अर्थसंकल्प : कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांसाठी विशेष योजना

Maharashtra Budget : एसटी महामंडळासाठी ३ हजार ३ कोटींची तरतूद

Maharashtra Budget : आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ११ हजार कोटी!

Back to top button