

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प आज (दि. ११) सादर करण्यात आला. या सरकारचा तिसरा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प वाचून दाखवला. तत्पूर्वी अर्थमंत्री पवार यांनी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन करताना सुरुवातीलाच त्यांनी स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडून २५० कोटींचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा केली.