Maharashtra Budget : आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ११ हजार कोटी! | पुढारी

Maharashtra Budget : आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ११ हजार कोटी!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्य सरकार आरोग्य सेवांवर ११ हजार कोटी खर्च करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. २०२२ चा राज्याचा अर्थसंकल्प ते मांडत आहेत. शासकीय ट्रॉमा केअर युनिट्स स्थापन करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरला आयुर्वेदिक संशोधन केंद्रासाठी १० हेक्टर जमीन देण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारणार असल्याचे ते म्हणाले. नाशिक, नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणार. तसेच पुणे शहराजवळ ३०० एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केलीय.

नेत्र विभागासाठी नियोजन

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक ‘फेको’ उपचार पध्दती सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे. एकूण ६० रुग्णालयांमध्ये ही उपचार पद्धती सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारणार असल्याचे ते म्हणाले. नाशिक, नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणार. तसेच पुणे शहराजवळ ३०० एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केलीय.

टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर हॉस्पिटल आयुर्वेदिक रुग्णालय आणि औषध वनस्पतींच्या लागवडीकरिता मौजे ताबाटी, ता. खालापूर, जि. रायगड येथील ३० हेक्टर जमीन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशु रुग्णालयांची स्थापना स्थापना करण्यात येईल. त्यानुसार हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, प कोरणपूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, नवजात औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन रुग्णालये करण्यात येतील. अकोला व बीड येथे स्वी रुग्णालयाचे बांधकाम श्रेणी वर्धनाचे काम हाती घेण्यात येत आहे.

सन २०२१-२२ या वर्षात राज्यात रुग्णखाटांची क्षमता १ हजार २०० ने श्रेणीवर्धन वाढून विशेषोपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यात ४९ रुग्णालयांच्या बांधकाम दुरुस्ती इतर कामांसाठी हजार ३९२ कोटी १२ लाख रुपये किंमतीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

जालना येथे ३६५ खाटांचे नवीन प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

महानगरातील तज्ज्ञ डॉक्टरांची निदान व उपचारांची सेवा ग्रामीण योजना भागातील जनतेस शिय आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलीमेडिसीन केंद्र स्थापन करण्यात येतील. पुढील उप्प्यात ही सेवा उपजिल्हा रुग्णालयापर्यंत विस्तारित करण्यात येईल.

सन २०२२-२३ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता सार्वजनिक आरोग्याचे कल्याण विभागाला २ हजार १८३ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये

११ मार्च १८८६ रोजी पेनसिल्वेनिया वुमन्स मेडिकल कॉलेजमधून एम.डी. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय व मराठी महिला डॉक्टर ठरल्या. आज या गोष्टीला १३६ वर्ष पूर्ण झाली आहेत.

Back to top button