मुंबई : पुढारी ऑनलाईन
महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी ज्या महिला कोविड काळात विधवा झाल्या आहेत, त्यांच्यासाठी सरकारने विशेष योजना जाहीर केलीय.
कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजनेची घोषणा करण्यात आलीय. या काळात अनेक महिलांनी आपल्या पतीला गमावलं आहे. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगारासाठी सरकार भांडवल उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये ५० टक्के राखीव तरतूद करण्यात आलीय. याआधी महिला शेतकऱ्यांसाठीची कृषी योजनांमध्ये राखीव असलेली तरतूद ३० टक्के आहे. आता ती वाढवून ५० टक्के करण्यात आलीय तसेच हे वर्ष महिला शेतकरी आणि मजूर वर्ष म्हणून साजरं केलं जाणार असल्याचे त्यांनी जाहिर केले.