हवामान खात्याचे ‘मलेरिया टुलकिट’; आयसीएमआरच्या देखरेखीखाली संशोधन | पुढारी

हवामान खात्याचे ‘मलेरिया टुलकिट’; आयसीएमआरच्या देखरेखीखाली संशोधन

पुणे : पुढारी वृत्तसेवा

हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या उद्रेकांचा अंदाज घेत, देशातून मलेरियावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी आयसीएमआर (भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थान), भारतीय हवामान शास्त्र विभाग व ओडिशा राज्याने एकत्र येत मलेरिया टुलकिट तयार करण्याची घोषणा गुरुवारी केली. याद्वारे हवामानातील बदल ओळखून आपल्या देशातून मलेरियाचे समूळ उच्चाटन केले जाईल, अशी अपेक्षा आहे.

russia ukraine war : रशियातून ३०० बड्या कंपन्यांनी गाशा गुंडाळला

हवामान विभागाच्या मदतीने मलेरियाचे देशातील हॉटस्पॉट शोधले जाणार आहेत. ’मलेरिया नो मोअर इंडिया’ हे घोषवाक्य तयार करून फोरकास्टिंग हेल्दी फ्चुचर्स, असे या कार्यक्रमाला नाव देण्यात आले आहे. हवामान विभागाच्या प्रगत डेटा प्रणालीवर हे अ‍ॅप काम करेल. जेथे मलेरियासारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे, त्याचा अंदाज त्या राज्यांना हवामान विभाग देईल. मलेरिया टुलकिटचे उद्घाटन ओडिशा सरकारने गुरुवारी केले. 2030 पर्यंत या टुलकिटच्या साहाय्याने देशातून मलेरियाचे समूळ उच्चाटन करण्याचे लक्ष्य हाती घेण्यात आले आहे.

गोव्यातील विजयाचा मुंबईत जल्लोष, देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची भाजपकडून जंगी तयारी

हवामानावर आधारित पूर्व सूचनांच्या तरतुदींसह मलेरिया अंदाज आणि नियोजन टुलकिटला पुढे नेण्यात अविभाज्य भूमिका बजावण्यास आम्ही उत्साहित आहोत. मी नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बोर्न डिसीजेस कंट्रोल, नॅशनल सेंटर फॉर डिसीजेस कंट्रोल व इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च बॉडी, ओडिशा सरकार आणि मलेरिया नो मोअर यांच्या सहयोगी प्रयत्नांना मलेरिया निर्मूलनाच्या या अभिनव कारणासाठी काम करण्यास आवाहन करतो.
                                 – डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, हवामान विभाग.

हेही वाचा

हरीश रावतांचे स्टिंग ऑपरेशन करणारा पत्रकार बनला आमदार, हेलिकॉप्टरवाला नेता म्हणून चर्चेत

घनसाळ, जिरगा तांदळाच्या देशी वाणाचे सुधारीकरण

Goa Election : पत्नीप्रेमापोटी कवळेकर साम्राज्याचा अस्त

Back to top button