russia ukraine war : रशियातून ३०० बड्या कंपन्यांनी गाशा गुंडाळला | पुढारी

russia ukraine war : रशियातून ३०० बड्या कंपन्यांनी गाशा गुंडाळला

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : युक्रेनवरील हल्ल्यांनंतर (russia ukraine war) अनेक पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. त्या निर्बंधांचे पालन करण्यासाठी जगभरातील जवळपास 300 मोठ्या कंपन्यांनी आता रशियातून गाशा गुंडाळला आहे. यात फोर्ड, टोयोटा, जनरल मोटर्स, फॉक्सवॅगन, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, निस्सान, अ‍ॅमेझॉन आणि बोईंग या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे.

ऑटोमोबाईल, फायनान्स, रिटेल, एंटरटेनमेंट आणि फास्ट फूड अशा क्षेत्रातील विवध कंपन्यांचा यात समावेश आहे. रशियाशी (russia ukraine war) सर्व संबंध संपुष्टात आणणार्‍या कंपन्यात अ‍ॅपल, फेसबुक, ट्विटर, नेटफ्लिक्स, स्पॉटिफाई, एआयआरबीएनबी, यूट्यूब, इंटेल, ब्रिटिश पेट्रोलियम, जनरल इलेक्ट्रिक, शेल, मास्टर कार्ड, वीजा, अमेरिकन एक्स्प्रेस, केएफसी, मूडीज, डिज्नी, यूनिलीवर आणि जारा या बड्या नावांचाही समावेश आहे. ब्रिटनने यापूर्वीच रशियन तेलाची आयात या वर्षाच्या अखेरपर्यंत रोखणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, युरोपियन (russia ukraine war) महासंघानेही काही रशियन खासदार, उद्योजक, श्रीमंत व्यक्‍तींसह बेलारूसच्या तीन बँकांवरही निर्बंधांची घोषणा केली आहे. तर ब्रिटनने रशियन अब्जाधीशांच्या विमानांसाठी स्वतःची हवाईहद्द बंद केली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी बाधित झाल्याने अनेक देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत.

अमेरिकेच्या वाणिज्य सचिव गिना रायमुंडो यांनी चीन कंपन्यांनाही इशारा देताना रशियावरील निर्बंधांकडे दुर्लक्ष केल्यास चीनला अमेरिकेकडून सॉफ्टवेयर आणि इतर उपकरणांची निर्यात रोखू, असे म्हटले आहे. सेमीकंडक्टर उत्पादक कंपन्यासह रशियाला तांत्रिक सहाय्य देणार्‍या इतर चिनी कंपन्यांवरही अमेरिका निर्बंध लावू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

Back to top button