पुणे : कांद्याच्या पिकात अफूचे अंतर्गत पीक घेणारा जेरबंद

ओतूर पोलिसांनी ताब्यात घेतलेली अफूची झाडे.
ओतूर पोलिसांनी ताब्यात घेतलेली अफूची झाडे.
Published on
Updated on

ओतूर : पुढारी वृत्तसेवा

जास्त पैसे मिळविण्याचा हव्यास असलेला माणूस कधीच स्वस्थ बसत नाही. झटपट खूप पैसे मिळतील या लालसेने झपाटलेल्या एकाने कांद्याच्या पिकात अंतर्गत पीक म्हणून अफूच्या झाडांची लागवड केल्यामुळे त्यास अटक करण्यात आल्याची माहिती ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.

ही घटना धोलवड (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. ८) गट नं १०८६ येथे घडली. विठ्ठल सखाराम नलावडे यांचे नावे असलेल्या शेतजमिनीत त्यांचा मुलगा महादेव विठ्ठल नलावडे (वय ५३) याने कांदा पिकाची लागवड केली आहे. त्यासोबत बेकायदेशीररित्या अफूचे (एकूण झाडे ८१) असे अंतर्गत पीकाची लागवड केली आहे. या झाडांना एकूण १८३ अफूची बोंडे लगडलेली दिसून येत असून, सर्व झाडांसहीत बोंडाचे वजन १३.१४२ किलोग्राम इतके आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे जप्त केलेल्या अफूची किंमत सुमारे ८५ हजार ४२३ रुपये इतकी आहे.

मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या अफूची लागवड करणे कायदेशीर गुन्हा असल्याने ओतूर पोलिसांनी प्रभावी पदार्थ अधिनियम कायदा १९८५ चे कलम ८, १५, १८,३२,४६ नुसार गुन्हा नोंद करून आरोपी महादेव विठ्ठल नलावडे यास मुद्देमालासह अटक केली आहे. याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई वाल्मिकी सोपान शिंगोटे यांनी दिली असून, तपास ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक केरूरकर करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news