मुळशी तालुक्यात ‘लुटूपुटू पोल’मुळे प्रबळ इच्छूकांची गोची | पुढारी

मुळशी तालुक्यात ‘लुटूपुटू पोल’मुळे प्रबळ इच्छूकांची गोची

विनोद माझीरे

पिरंगुट : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीआधी मुळशी तालुक्यात इच्छूक उमेदवारांचे कार्यकर्ते भलतेच उतावीळ झालेले दिसत आहेत. प्रशासन अजून कच्ची प्रभागरचना जाहीर करेना; मात्र कार्यकर्त्यांनी ऑनलाइन मतदानाचा लुटूपुटू पोलमधून कौल मिळवायला सुरवात केली आहे. त्यामुळे तालुक्यात हे ऑनलाइन पोल हे भुईछत्राप्रमाणे उगवू लागले आहेत. परिणामी प्रबळ इच्छूक उमेदवारांची गोची होत असून, चर्चेत नसलेला उमेदवार मात्र यामुळे भलताच खुश होत आहे.

शेअर बाजारावर युद्धाचं सावट कायम! सेन्सेक्स १,१०० अंकांनी घसरला

मुळशी तालुक्यात अनेक प्रबळ इच्छूक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. अनेक जण मतदारांपर्यंत पोहोचले आहेत. विविध कार्यक्रम, समारंभ, विविध स्पर्धा, धार्मिक उत्सव व विधी, सुख-दुःख प्रसंगी उपस्थित राहून मतदारांना आपलेसे करण्यात हे इच्छूक उमेदवार प्रयत्न करताना दिसत आहे. उमेदवारांचे आपापल्या परीने प्रयत्न चालू आहेत. प्रशासन अद्याप काही ठोस भूमिका घेताना दिसत नाही, त्यामुळे अजून देखील नवी प्रभागरचना कशी असेल याबाबत साशंकता मोठ्या प्रमाणावर आहे. असे असताना कार्यकर्त्यांना मात्र स्वस्थ बसवत नाहीये.

युक्रेन अण्विक प्रकल्प : आग विझली पण चेर्नोबिलपेक्षा १० पट धोका कायम

चर्चेत नसलेले उमेदवार खुशीत

आपला नेता कसा पॉवरफुल आहे, हे दाखवण्यासाठी ऑनलाइन पोलची लिंक आपल्याच कार्यकर्त्यांना पाठवून मतदान करायला लावले जात आहे. त्यामुळे खरा प्रबळ इच्छूक असलेला उमेदवार मात्र त्यातून अडचणीत येताना दिसत आहे. जो उमेदवार चर्चेत नाही त्याला देखील प्रबळ उमेदवारांच्या जवळचे मतदान झालेले दिसत असल्याने तो उमेदवार भलताच खुश होत आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय इथून पुढे एकही निवडणूक होणार नाही : फडणवीस

मुळशी तालुक्यात यंदा जिल्हा परिषदेच्या 4 जागा व पंचायत समितीच्या 8 जागा आहेत. गतवेळीपेक्षा जिल्हा परिषदेची 1 व पंचायत समितीच्या 2 जागा वाढल्या असल्याने साहजिकच गतवेळीपेक्षा यावेळी इच्छूकांची संख्या मोठी आहे. जागा वाढल्याने एका प्रभागात मर्यादित गावे येत असल्याने इच्छूक वाढले आहेत. त्यामुळे यंदा निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे. जोपर्यंत प्रभागरचना अंतिम स्वरूप घेत नाही व आरक्षण जाहीर होत नाहीत तोपर्यंत अनेक पत्ते देखील झाकलेलेच असतील. खरे पत्ते पलटल्यावर रणधुमाळी सुरू होईल. तोपर्यंत ही लुटूपुटूची लढाई सुरूच राहील. मात्र त्यासाठी कार्यकर्ते जीवाचं रान करत आहेत हे नक्की.

युद्ध युक्रेनमध्ये पण फोडणी महागली भारतात; खाद्यतेलांच्या किमतीत वाढ

Back to top button