पुणे : आक्षेपार्ह पत्रके वाटल्याप्रकरणी मिलिंद एकबोटेंसह 20 जणांवर गुन्हा | पुढारी

पुणे : आक्षेपार्ह पत्रके वाटल्याप्रकरणी मिलिंद एकबोटेंसह 20 जणांवर गुन्हा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्येश्वर मंदिर येथील दर्गाच्या बांधकामाला न्यायालयाची स्थगिती असताना व तेथे काम सुरु नसताना काम सुरु असल्याचे सांगून दिशाभूल करणारी आक्षेपार्ह पत्रके वाटून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

व्लादीमीर पुतीन यांची तब्बल ७२९ कोटी रुपयांची आलिशान नौका हॅकर्सच्या निशाण्यावर !

सुनिव तांबट (वय 53, रा. कसबा पेठ), स्वप्नील अरुण नाईक (वय 36, रा. गुरुवार पेठ), मुकुंंद मारुतीराव पाटोळे (वय 62, रा. मंगळवार पेठ), मिलिंद रमाकांत एकबोटे (वय 65, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर), नंदकिशोर रमाकांत एकबोटे (वय 60, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर), योगेश भालचंद्र वाडेकर (वय 41, रा. शुक्रवार पेठ), कुणाल सोमेश्वर कांबळे (वय 39, रा. नवी सांगवी), रवींद्र राजेंद्र ननावरे (वय 33, रा. पर्वती दर्शन), संतोष कमलाकर अनगोळकर (वय 44, रा. धनकवडी), धारुदत्त वसंत शिंदे (वय 52, रा. सहकारनगर), धनंजय मारुती गायकवाड (वय 51, रा. सदाशिव पेठ), प्रशांत प्रकाश कांबळे (वय 24, रा. मंगळवार पेठ), देवीसिंग मोहनसिंग दशाना, विकी रमेश चव्हाण, आदित्य ज्ञानेश्वर कांबळे, विश्वजीत ज्ञानदेव भिसे , आकाश प्रभाकर माने, पार्थ जय प्रकाश पांचाळ, आदित्य संतोष राजपूत आणि वैभव वाघ अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

#OperationGanga :गेल्या २४ तासात १३०० भारतीयांची युक्रेनमधून सूटका

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विविध समाजमाध्यमांवर सुनियोजितरित्या कट रचून दोन समाजामध्ये धार्मिक तेढ होणारे मजकूर असलेले संदेश, व्हिडिओ व निमंत्रण पत्रिका या सोशल मीडियावर प्रसारीत करुन सर्व हिंदु धर्मीय लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांना पवळे चौकात एकत्र जमवले. तेथे महाआरती केली. पोलीस सह आयुक्त यांनी जारी केलेल्या कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

‘Google’चा रशियावर सायबर स्ट्राईक, ‘Play Store’वरील सरकारी ॲप ब्लॉक!

युद्धाला विरोध : रशियात शाळकरी मुलांना अटक!

तिसरे महायुद्ध झाल्‍यास महाविनाश होईल : रशियाच्‍या परराष्‍ट्र मंत्र्यांचा इशारा

Back to top button