युद्धाला विरोध : रशियात शाळकरी मुलांना अटक! | पुढारी

युद्धाला विरोध : रशियात शाळकरी मुलांना अटक!

मास्‍को : पुढारी ऑनलाईन
युक्रेनविरोधात सुरु केलेल्‍या युद्धाला आता रशियातच विरोध होताना दिसत आहे. मात्र विरोध करणार्‍यावर पाेलिस कारवाई केली जात आहे. देशातील शाळकरी मुलांवरही दडपशाही सुरु असल्‍याचा आरोप रशियातील विरोधी पक्षाच्‍या नेत्‍यांनी केला आहे. एका रिपोर्टनुसार रशियातील ५० हून अधिक शहरांमध्‍ये युद्धाला विरोध केल्‍याप्रकरणी ७ हजारांहून अधिक नागरिकांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. यामध्‍ये शाळकरी मुलांचाही समावेश आहे.

रशियाची राजधानी मास्‍कोमध्‍ये शाळकरी मुलांना पोलीस व्‍हॅनमधून घेवून जातानाचे छायाचित्र विरोधी पक्ष नेत्‍यांनी प्रसिद्‍ध केले आहे. युद्धाच्‍या विरोधात फलक हातात घेवून निषेध केल्‍याचा ठपका त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आला आहे. आता राष्‍ट्रद्रोहाच्‍या आरोपाखाली त्‍यांना कारागृहात डांबले जावू शकते, अशी भीतीही विरोधी पक्षाच्‍या नेत्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.

रशियातील विरोधी पक्ष नेत्‍यांनी प्रसिद्‍ध केलेल्‍या फोटोत स्‍पष्‍ट दिसत आहे की, पोलिस व्‍हॅनमध्‍ये तीन शाळकरी मुले बसली आहेत. त्‍यांच्‍या हातात ‘नो वॉर’ असा फलक आणि फुले आहेत. फुले घेवून ही मुले मास्‍को दुतावासात गेली होती. या मुलांकडे रशिया आणि युक्रेनचे ध्‍वजही होते. त्‍यांना पोलिसांना ताब्‍यात घेतले आहे, अशी माहिती रयिशाच्‍या विरोधी पक्ष नेत्‍यांनी दिली.

हेही वाचलं का?

 

Back to top button