पुणे : डेव्हलपमेंटच्या नावाखाली बकालपणा नको, तळजाईचे निसर्गत्व टिकून ठेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

पुणे : डेव्हलपमेंटच्या नावाखाली बकालपणा नको, तळजाईचे निसर्गत्व टिकून ठेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

वनविभागाकडून आणि स्थानिक प्रतिनिधींकडून तळजाई टेकडी डेव्हलपमेंटच्या नावाखाली तिचा नैसर्गिकपणा घालवला जात आहे, हे योग्य नाही. डेव्हलपमेंटच्या नावाखाली बकालपणा करणे थांबवा आणि तळजाई टेकडीचे निसर्गत्व टिकवून ठेवा, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. वनविभागाकडून तळजाई वन उद्यान येथील विविध कामांचा उद्घाटन सोहळा शनिवारी (दि.२६)  सकाळी पार पडला, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वन राज्यमंत्री दत्ता भरणे, आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक सुभाष जगताप, दत्ता धनकवडे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख व अन्य उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळजाई टेकडी येथे प्रवेशद्वार, कोनशिला व अन्य कामांचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी केलेल्या पाहणीत तळजाई टेकडीवरचे निसर्गत्व हरवत चालल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी त्यांनी नाराजी दर्शवत अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्या. डेव्हलपमेंटच्या नावाखाली तळजाई टेकडीवर चाललेला बकालपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, तळजाई टेकडीवर येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना याबाबत तक्रार करायची असेल, तर दर आठवड्याला मी पुण्यात असतो, मला येऊन भेटा. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात येतील., असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

भटक्या व पाळीव कुत्र्यांना उद्यानात मज्जाव

यावेळी पवार यांनी येथील पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवणार असल्याचे आश्वासन देत, तळजाई टेकडीला अनेक ठिकाणी कंपाऊंड नसल्यामुळे निर्माण होणार्‍या समस्यांवर प्रकाशझोत टाकला. यात भटक्या कुत्र्यामुळे येथील सशांचे, मोराचे प्रमाण कमी होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच तळजाई उद्यानात भटक्या व पाळीव कुत्र्यांना आणण्यास मज्जाव करण्याच्या सूचनाही केल्या.

हेही वाचलत का ?

Back to top button