पुणे : हडपसरमध्ये भाजप-राष्ट्रवादीतच खरी रस्सीखेच | पुढारी

पुणे : हडपसरमध्ये भाजप-राष्ट्रवादीतच खरी रस्सीखेच

प्रमोद गिरी

पुणे / हडपसर : हडपसर गावठाण-सातववाडी प्रभाग क्रमांक 25 हा प्रभाग पूर्वीच्या प्रभागाप्रमाणेच आहे. फक्त त्यात वीस टक्के म्हाडा सोसायटीचा भाग समाविष्ट केला गेला आहे. या प्रभागातून भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मागील पालिकेच्या निवडणुकीत समान उमेदवार निवडून दिले होते. या प्रभागात दोन्ही पक्षांची ताकद समान आहे. मात्र, काही भाग 45 प्रभागात जोडला गेला आहे. त्यामुळे या प्रभागात भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची कसरत आहे. पक्षातील अंतर्गत दबावगट आणि त्याचा फायदा भाजपला होणार की राष्ट्रवादीला, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

रशिया-युक्रेन तणाव : युक्रेनमधून २४२ भारतीय मायदेशी परतले

हडपसर गावठाण-सातववाडी प्रभाग क्रमांक 25 मधून भाजप व राष्ट्रवादी पक्ष सोडला, तर इतर पक्ष दुबळे आहेत. यामुळे पक्षांतर करून आजी-माजी लोकप्रतिनिधी नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहत आहेत. राष्ट्रवादीतून योगेश ससाणे, वैशाली सुनील बनकर, डॉ. शंतनू जगदाळे, विजय मोरे, विजया कापरे, कमलेश कापरे, संजय शिंदे, उल्हास तुपे, सोमनाथ तुपे. भाजपमधून मारुती तुपे, शिल्पा होले, नितीन होले, गणेश घुले, आकाश डांगमाळी, स्मिता गायकवाड, मनोहर देशमुख, योगिता देशमुख. काँग्रेसमधून गणेश फुलारे, पल्लवी प्रशांत सुरसे, स्वप्नील डांगमाळी, नितीन आरू. आपमधून प्रभाकर भोसले, स्वाती महेश टेळे इच्छुक आहेत, तर शिवसेनेतून विजय देशमुख, विनोद धुमाळ, विद्या होडे, प्रशांत पोमण आदी इच्छुक आहेत.

Nawab Malik Arrest : मोठी बातमी! नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

आघाडीवरच ठरेल अपक्षांची संख्या

या प्रभागात आघाडी झाली, तर प्रत्येक पक्षातून एकाला संधी द्यावी लागेल. बिघाडी झाली, तर प्रत्येक पक्षातून पालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. पाच वर्षांपूर्वी ज्या समस्या प्रभागात होत्या, त्या अद्यापही कायम आहेत. रामटेकडी येथील कचरा प्रकल्प हलविण्यात अद्याप कोणालाही यश आलेले नाही. नागरिकांना गेल्या पाच वर्षांत ज्या समस्या आल्या, त्याच समस्या आता 2022 लाही आहेत. त्यात विशेष फरक पडलेला नाही. त्यामुळे नवीन उमेदवारांनाही मोठे आव्हान असणार आहे.

US Vs Russia : अमेरिका आणि कॅनडाने रशियावर लादले कडक आर्थिक प्रतिबंध

अशी आहे प्रभागरचना

हडपसर गावठाण, सातववाडी, सुरक्षानगर, हडपसर गाडीतळ बस स्टॉप, गोंधळेनगर, दिवंगत हेमंत करकरे उद्यान, बनकर हायस्कूल, आयुष हॉस्पिटल, सातववाडी, लक्ष्मीनारायण कॉलनी, बनकर कॉलनी, उत्कर्षनगर, ओंकार संस्कृती सोसायटी, नवनाथ कॉलनी, विघ्नहर्ता कॉलनी, ससाणेनगर, सेझल रेसिडेन्सी, हडपसर मनपा प्रभाग कार्यालय, गंगा रेसिडेन्सी, वैभव मल्टीप्लेक्स, रामोशी आळी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले क्रीडांगण आदी भाग समाविष्ट केला आहे.

  • एकूण लोकसंख्या : 55782
  • अनुसूचित जाती : 7249

Back to top button