US Vs Russia : अमेरिका आणि कॅनडाने रशियावर लादले कडक आर्थिक प्रतिबंध | पुढारी

US Vs Russia : अमेरिका आणि कॅनडाने रशियावर लादले कडक आर्थिक प्रतिबंध

वाॅशिंग्टन/ओटावा, पुढारी ऑनलाईन : युक्रेन आणि रशिया यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत अमेरिका आणि कॅनडाने रशियावर कडक आर्थिक निर्बंध लावलेले आहेत. मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी रशियाविरुद्ध अनेक आर्थिक प्रतिबंध लावले असल्याचे जाहीर केले होते. रशियाचे व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण केले आहे, असा आरोपही अमेरिकेने केलेला आहे. (US Vs Russia)

रशियाविरुद्ध आर्थिक प्रतिबंधांबाबत घोषणा करतेवेळी जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “रशिया युक्रेनवर आक्रमण करत आहे, यात तिळमात्र शंका नाही. ज्याचा आम्ही सामना करत आहोत, त्या आव्हानांना पेलण्यासाठी आम्ही तयार आहोत. एक दिवसापूर्वीच पुतीन यांनी युक्रेनमधील दोन क्षेत्रांना स्वतंत्र राज्य असल्याची मान्यता दिली होती. त्यातच ते म्हणाले की, ही क्षेत्रं आता युक्रेनची राहिली नाहीत.”

“या दोन राज्यांमध्ये रशियन सेनेला तैनात राहण्याचे आदेश व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी रात्री दिले आहेत. खरंतर या दोन राज्यांवर ताबा किंवा स्वतंत्र असल्याच्या घोषणेचा विचार केला असता हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. जो सध्यस्थिती युक्रेनी सरकारच्या अधिकारातील महत्त्वाची राज्ये आहेत, असा दावा केला जात आहे”, अशीही माहिती जो बायडेन यांनी दिली. (US Vs Russia)

दुसरीकडे कॅनडानेदेखील युक्रेनमधील फुटिरतावादी क्षेत्रांना स्वतंत्र राज्याची मान्यता दिल्यामुळे व्लादिमीर पुतीन यांच्या निर्णयाला विरोध करत रशियावर आर्थिक निर्बंध लावलेले आहेत. यामध्ये कॅनडाने म्हटलं आहे की, “या निर्बंधांमध्ये लुहान्स्क आणि डोनेट्स्क या राज्यांना जो काही स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला आहे, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्यावर कॅनेडियन नागरिकांना बंदी घातली आहे. कॅनेडियन नागरिकांवर रशियाआश्रीत राज्यांवर किंवा दोन नव्या राज्यांच्यासंबंधित रशियन बॅंकेबरोबर कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे.”

व्हिडिओ पहा : आर्थिक वेडाचार

Back to top button