पुणे : तिसऱ्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगारांचा मृत्यू | पुढारी

पुणे : तिसऱ्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगारांचा मृत्यू

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा

नवीन इमारतीचे काम सुरु असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या परप्रांतीय बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २१) दुपारी आळेफाटा येथे उघडकीस आली. याविषयी आळेफाटा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पारस मदील प्रसाद (वय ५६, रा. मंग्रेचा, ता. सेलमपूर, जि. देवरिया, राज्य उत्तरप्रदेश, हल्ली रा. आळेफाटा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

supriya sule : सुप्रिया सुळे यांच्यासह अकरा खासदारांचा होणार संसद रत्न पुरस्काराने गौरव

याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पारस प्रसाद आळेफाटा येथे स्वामी समर्थ डेव्हलपर्स यांच्या सुरु असलेल्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कॉलमला लोखंडी हातोडीच्या सहायाने शिकंजी मारण्याचे काम करत होते. नेहमीप्रमाणे काम सुरु असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पारस प्रसाद खाली पडल्याने जखमी झाले. त्याला काही वेळात आळेफाटा येथील खासगी हॉस्पिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. औधेश मुन्नर प्रसाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नितीशकुमार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? प्रशांत किशोर यांची भाजपविरोधात रणनीती!

पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून हवालदार संजय शिंगाडे तपास तपास करीत आहेत. बांधकाम साईटवर सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या उपयायोजनांबाबत पोलीस तपास करून काय कारवाई करतात याकडे नातलगांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

चंद्रपूर : उर्जानगर येथे दहशत माजविणारा वाघ जेरबंद

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, ६ महिला जागीच ठार

मदरसा आणि वैदिक पाठशाळांना शिक्षण अधिकार कायद्यात आणावे : दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

Back to top button