येवला : पुढारी वृत्तसेवा : येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील रहिवासी असलेले नारायण निवृत्ती मढवई या 39 वर्षीय लष्करी जवानाचा हरियाणा मधील हिस्सार येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाला आहे.
यासंदर्भात येवला तालुक्याचे आमदार व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, ही वार्ता ऐकुन अतिशय दु: ख झाले. शेतकरी कुटुंबातून पुढे येत सैन्यदलात भरती झालेले नारायण मढवई यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ठ अशी कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारतमातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. त्यांच्या निधनाने मढवई कुटुंबासोबतच संपूर्ण तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी शहीद जवान मेजर नारायण मढवई यांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो. असा शोकसंदेश भुजबळ यांनी पाठवला आहे.