मंत्री बच्चू कडूंना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा | पुढारी

मंत्री बच्चू कडूंना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

अमरावती, पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपविली. त्‍यामूळे त्‍यांना दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाकडून हा निर्णय देण्यात आला आहे.

बच्चू कडू यांनी 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत आपल्‍या मुंबई येथील फ्लॅटची माहिती दिली नव्हती. चांदूरबाजारमधील भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्ये याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर बच्चू कडू यांच्या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयात याची सुनावणी सुरू होती. बच्चू कडू यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ अन्वये गुन्हा सिद्ध झाला आहे. या निकालाला हायकोर्टात बच्चू कडू यांचे कडून आव्हान देण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण ?

२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांनी प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रात त्‍यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती दिली नाही. त्‍यांच्या विरोधात अमरावतीमधील अचलपूर येथील भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार केली होती .

हे ही वाचलं का  

Back to top button