पुणे : आणखी एका जखमी बिबट्याच्या आईला जीवदान | पुढारी

पुणे : आणखी एका जखमी बिबट्याच्या आईला जीवदान

ओतूर : पुढारी वृत्तसेवा

खामुंडी (ता. जुन्नर) येथील खामुंडी ते बदगी बेलापूर रस्त्याच्या परीसरात दोन दिवसांपूर्वी रवींद्र डोंगरे या शेतकऱ्याच्या शेत जमिनीजवळ खोल ओढ्यात अंदाजे आठ ते नऊ महिने वयाच्या बिबट्याच्या जखमी मादीला ताब्यात घेतले होते. अगदी तशीच घटना पुन्हा त्याच जागेवर घडली आहे.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक

याच परिसरात असणारे शेतकरी किसन बाळशीराम शिंगोटे व कैलास बाळशीराम शिंगोटे हे कांद्याला पाणी देत असताना बाजूला जवळच असणाऱ्या ओढ्यात बिबट्याची मादी जखमी अवस्थेत त्यांना आढळली. जखमी बिबट मादीचे दिवसा दर्शन झाल्यामुळे त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी सावध पवित्रा घेत त्वरेने कैलास बोडके यांना संपर्क करून झालेली हकीकत सांगून वनविभागाशी संपर्क केला.

Pimpari : भाजपचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांना अटक

बोडके यांनी वनक्षेत्रपाल सुधाकर गिते यांना संपर्क करून घटना सांगितल्यानंतर तातडीने जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमित भिसे व ओतूर वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक किसन केदार, महेंद्र ढोरे, गंगाराम जाधव, नवनाथ जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली व ओढ्यातील जखमी पडलेल्या बिबट्याच्या मादीला अथक परिश्रम करत रेस्क्यू करून ताब्यात घेतले व पुढील उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात पाठविले.

Param Bir Singh : परमबीर सिंग यांची एसीबीकडून दोन तास कसून चौकशी

डॉ. निखिल बनगर हे जखमी बिबट्याच्या मादीवर उपचार करत असल्याची माहिती सुधाकर गिते यांनी दिली असून याच परिसरात दोन दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या बिबट्याच्या मादीची ही आई असल्याचे त्यांनी सांगितले.

Kolhapuri Product : बजेटचा कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, आणि चप्पलला होणार फायदा !

बिबट्याची ही मादी ज्या ठिकाणी जखमी होऊन ओढ्यात पडली होती, त्याच ठिकाणाहुन अगदीच काहीशा अंतरावर शेतकरी किसन शिंगोटे व कैलास शिंगोटे यांची शेती आहे. ते शेतात पाणी देत असताना जखमी मादीला पाहुन भयभीत झाले होते; मात्र या बिबट्याच्या मादीला वनविभागाने ताब्यात घेतल्याने त्यांनी सुटकेचा नि :श्वास सोडला आहे. बिबट्याच्या मादीला बघण्यासाठी परिसरातून तोबा गर्दी झाली होती.

अखेर नितेश राणे कणकवली न्यायालयात शरण ! परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त

Back to top button