Pimpari : भाजपचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांना अटक | पुढारी

Pimpari : भाजपचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांना अटक

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे गाळे मिळवून देण्याच्या आमिषाने छोट्या व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याप्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर तथा विद्यामान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह पाच जणांना मध्यरात्री अटक करण्यात आली. हा प्रकार पिंपरी येथे उघडकीस आला. (Pimpari)

माजी उपमहापौर केशव घोळवे, गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनश्याम यादव, मलका यादव, हसरत अली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मोहम्मद तय्यब अली शेख (२५, रा. शास्त्री नगर पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील डेक्कन होंडा समोरील जागा मेट्रोच्या प्रकल्‍पात जात असल्याने आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादीसह इतर व्यापाऱ्यांना गाळे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून ५५ हजार रुपये घेतले. तसेच, अन्य व्यवसायिकांकडून भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये बाराशे रुपयांच्या पावत्या फाडून घेतल्या. (Pimpari)

त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र, फिर्यादी यांनी पुन्हा पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहे.

Pimpari : डब्बू आसवानी यांनी केला होता अर्ज

राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर हीरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी आपल्या नावाने व्यापाऱ्यांकडून कोणीतरी पैसे वसूल करत असल्याची तक्रार पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली होती. दरम्यान, या अर्जाची चौकशी करीत असताना पोलिसांना आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यानुसार, आरोपींवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे.

Back to top button