काणकोण : मल्लिकार्जुन’च्या ऐतिहासिक दस्तऐवजाचे डिझिटलायझेशन; लोकार्पण सोहळा होणार शनिवारी | पुढारी

काणकोण : मल्लिकार्जुन’च्या ऐतिहासिक दस्तऐवजाचे डिझिटलायझेशन; लोकार्पण सोहळा होणार शनिवारी

काणकोण : पुढारी वृत्तसेवा
श्रीस्थळ येथील मल्लिकार्जुन देवालयाच्या ऐतिहासिक माहितीचे संकलन व डिझिटलायझेशन केलेल्या दस्तऐवजाचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता.5) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

देवालय समितीला देवालय कामकाजाचा 1880 सालाचा मोडी, पोर्तुगीज व नागरी अशा मिश्र भाषांतील माहितीचा दस्तऐवज मिळाला आहे. त्याचे डिझिटलायझेशन व सीडी स्वरूपात संकलन करण्यात आले आहे.हा दस्तऐवज पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

या सोहळ्याला पेडणे येथील संत सोहिरोबानाथ महाविद्यालयाचे सहायक अध्यापक व इतिहास संशोधक रोहित फळगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याच्याच हस्ते हे लोकार्पण करण्यात येईल.

याचवेळी संकलन कामात विशेष योगदान दिलेल्या मल्लिकार्जुन आणि चेतन मंजू देसाई महााविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत व सहकार्याचा देवालयाचे ज्येष्ठ महाजन शांताजी नाईक गावकर यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे, असे देवालय समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

हेही वाचलतं का?

Back to top button