भारतामध्ये लॉंच झाली इलेक्ट्रिक मोटारसायकल क्राटोस आणि क्राटोस आर… | पुढारी

भारतामध्ये लॉंच झाली इलेक्ट्रिक मोटारसायकल क्राटोस आणि क्राटोस आर...

पुणे : पुढारी वृत्तसेवा

टोर्क क्राटोस स्टार्टअप कंपनीने भारतामध्ये १००किमी पेक्षा जास्त स्पीड देणारी इलेक्ट्रिक मोटारसायकल लॉंच केली आहे. ही बाईक दोन प्रकारात लॉन्च झाली आहे. क्राटोस आणि क्राटोस आर या नावाने ही ओळखली जाईल. या मोटारसायकलींना स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. त्याची सुरुवातीची किंमत दिल्लीतील अनुदानानुसार 1.02 लाख रुपये आहे, ही किंमत दिल्लीच्या एक्स-शोरूमनुसार देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की ही इलेक्ट्रिक बाइक एका चार्जमध्ये 180 किमी एवढे स्पीड देईल.

पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह

९९९ रु पासून बुकिंग करता येऊ शकते.

लॉन्च झाल्यापासून, कंपनीने त्याच्या दोन्ही व्हेरियंटचे बुकिंग सुरू केले आहे. मात्र, त्याच्या डिलिव्हरीची माहिती देताना कंपनीने सांगितले की, या वर्षी एप्रिलपासून डिलिव्हरी सुरू केली जाईल. पण तुम्ही आजच ९९९ रुपयांमध्ये प्री-बुक करू शकता. या दोन्ही बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीमध्ये क्राटोस ची किंमत अनुदानासह १०२४९९ रुपये आणि क्राटोस आर ची किंमत ११७४९९ रुपये आहे. यामध्ये अनेक रंगांचे पर्याय आहेत, ज्यामध्ये पांढरा, निळा, लाल आणि काळा असे पर्याय दिले आहेत.

भिवंडी अपघात : कोळशासह ट्रॉली झोपडीवर उलटली; तीन चिमुरड्या सख्ख्या बहिणींचा जागीच अंत

टॉप स्पीड किती असेल-

या दोन्ही प्रकारातील बाईक बद्दल बोलायचं झाले तर या इलेक्ट्रिक बाईक चा टॉप स्पीड १०५ किमी/तास आहे, जो एका चार्जमध्ये १८० किमीपर्यंत जातो. यात एक मजबूत बॅटरी आहे, जी ७.५ Kw ची कमाल पॉवर जनरेट करू शकते आणि २८ Nm टॉर्क जनरेट करू शकते. सुरुवातीच्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध होणार असून त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी शहरांचा समावेश केला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, ट्विटमधून दिली महत्वाची माहिती

या मोटारसायकलमध्ये काय विशेष आहे

या दुचाकीमध्ये फास्ट चार्जिंग ऑप्शन जिओ फेन्सिंग आणि फाइंड माय व्हेईकल फीचर्स, मोटरवॉक असिस्टंट फीचर्स, क्रॅश अलर्ट, व्हेकेशन मोड आणि ट्रॅक मोड अॅनालिझ सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. बाइकमध्ये 4 kWh लिथियम आयन बॅटरी आहे, जी ४८वि चा व्होल्टेज देते.

मॅरेथॉन धावण्याचा पुणेकर आशिष कासोदेकरांचा जागतिक विक्रम

ही इलेक्ट्रिक मोटारसायकल देणार इतर दुचाकींना टक्कर

या दुचाकीच्या तुलनेबद्दल बोलायचे झाले तर, ही इलेक्ट्रिक दुचाकी भारतीय बाजारपेठेत आधीपासून अस्तित्वात असलेल्या रिव्हॉल्ट आरव्ही ४०० (रु. १,१७,०२०रु),जॉय ई-बाईक मॉन्स्टर (रु. १,०१,०५५रु) यांना टक्कर देईल. या इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये असे अनेक फिचर्स दिले आहेत,जे इतर दुचाकींमध्ये नाहीत.

Covishield आणि Covaxin आता हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार ! DCGI ने दिली परवानगी

Back to top button