लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, ट्विटमधून दिली महत्वाची माहिती | पुढारी

लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, ट्विटमधून दिली महत्वाची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यावर अद्यापही ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण, त्यांची प्रकृती अद्याप स्थिर असल्याची माहिती समोर आलीय. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी त्यांच्याविषयी महत्त्वाची माहिती दिलीय.

लता यांच्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांच्या आरोग्याविषयीची माहिती देण्यात आलीय. ट्विटमध्ये म्हटलंय- लतादिदी अद्यापही ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज सकाळी त्यांना व्हेंटिलेटर लावलं नव्हतं. आता त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या टीमचं नेतृत्व डॉ. प्रतीत समदानी करत आहेत. आम्ही सगळ्यांच्या प्रार्थनांसाठी त्यांचे आभार मानतो. लतादीदींना लवकरच बरं वाटेल अशी आशा आम्हाला वाटते आहे.’

लता यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांना न्यूमोनियादेखील झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या उपचारांना साथ देत असून, त्यांची प्रकृती काहीशी सुधारत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Back to top button